बुधवार, मे 28, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : केईएम रुग्णालयातही शिरलं पावसाचं पाणी, रुग्णांची वाईट अवस्था, परिस्थिती कठीण तरीही…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 26, 2025 | 1:54 pm
in Social
Reading Time: 3 mins read
google-news
Mumbai Heavy Rain

Video : केईएम रुग्णालयातही शिरलं पावसाचं पाणी, रुग्णांची वाईट अवस्था

Mumbai Heavy Rain : गेल्या काही तासांपासून मुंबई आणि उपनगरातील भागांना पावसाने अक्षरशः झोडपलं आहे. विविध भागांमध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सकाळपासून तर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अशातच हवामान खात्याने आणखी काही तास मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अचानक आलेल्या पावसाचा फटका अनेक भागांना बसला. त्याचबरोबरीने मुंबईची लाईफ लाइन लोकल रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाचे हाल झाले. तास तासभर एकाच जागी उभं राहण्याची वेळ आली. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. मात्र मुंबईतील केईएम रुग्णालयातील परिस्थिती आणखीनच भयावह होती. रुग्णालयात पाणी शिरल्यानंतर रुग्णांची तारांबळ उडाली. (Heavy rain Kem hospital)

आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरला. दक्षिण मुंबईतही पावसाची जोरदार हजेरी आहे. अशातच लालबाग, काळाचौकी, परेल, दादर परिसर जलमय झाला. दक्षिण मुंबईत महत्त्वाचं आणि मुख्य केईएम रुग्णालयालाही पावसाचा मोठा फटका बसला. रुग्णालयात पाणी तुंबायला सुरुवात झाली. त्यानंतर सगळ्यांची एकच तारांबळ उडाली. पाणी तुंबताच रुग्णांना काही करावं सुचेना. त्यांनी वॉर्डबाहेर ठेवण्यात आलेल्या बाकावर बसण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – Video : गरम सहन न झाल्याने आई लेकरांना घेऊन थेट एटीएममध्येच झोपली, मस्त एसीमध्ये आराम करत होती आणि…

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Metro City Samachar (@metrocitysamachar)

रुग्णालयाच्या तळमजल्यापर्यंत हे पाणी पोचलं. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, रेडिओलॉजी डिपार्टमेमटमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली. डॉक्टर व रुग्ण त्यामधूनच वाट काढत होते. डॉक्टरही या सगळ्यामध्ये रुग्णांची सेवा करत आहेत. वाढतं पाणी पाहता रुग्णालय प्रशासनाने तुंबलेलं पाणी काढण्यास सुरुवात केली. अजूनही कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयातील पाणी कमी करण्याचं काम सुरु आहे. केईएम रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार सुरु असतात. या परिसरात नेहमीच मोठी वर्दळ असते. तसेच रुग्णांचीही मोठी संख्य असते. आता जोरदार पावसामुळे सगळ्यांचेच हाल झाले आहेत. मेट्रो सिटी समाचारने केईएम रुग्णालयाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीला ओळखणंही झालं कठीण, लग्नानंतर वजन इतके वाढले की…; व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्

पहिल्याच पावसात शहरात जलमय वातावरण आहे. पाण्यामधून वाहून येणारा कचरा आणि समोर आलेलं दृश्य खरचं भयावह आहे. काही दिवसांपूर्वीही अचानक आलेल्या पावसामध्ये साकीनाका परिसरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामध्ये फक्त कचराच दिसत होता. आताही शहरातील विविध भागांमध्ये साचलेल्या पाण्यात फक्त कचरा आहे. त्यामुळे पावसापूर्वी प्रशासन नक्की काय करत होतं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Tags: trending newstrending video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Beed Farmer News
Social

“कांदा विकून बाबा शाळेची फी भरणार होते पण…”, पावसात कांदा वाहून जाताच शेतकऱ्याच्या लेकीचा भावुक व्हिडीओ, स्वप्न पाहिलेली आणि…

मे 27, 2025 | 7:00 pm
Harbhajan Singh On trolling
Entertainment

विराट कोहलीवरुन त्याच्या बायकोलाही ट्रोल करणाऱ्यांवर हरभजन सिंह भडकला, म्हणाला, “कधीतरी हरतो पण त्यासाठी कुटुंबाला…”

मे 27, 2025 | 6:30 pm
Vaishnavi hagawane death case
Social

“चंदेरी थाळी, सोनेरी बटण…”, वैष्णवी हगवणेचा लग्नातील उखाणा व्हायरल, ‘त्या’क्षणी रडली अन्…;

मे 27, 2025 | 6:02 pm
Prathamesh Parab Wife Video
Entertainment

“तुला डोकं नाही आहे”, प्रथमेश परबच्या बायकोला नेटकऱ्याने हिणवलं, म्हणाली, “माझं कौतुक म्हणून स्वीकारते आणि…”

मे 27, 2025 | 4:14 pm
Next Post
Shivani Rangole Emotional Post

"दोन वर्ष हसत, रडत, समजून घेत…", 'तुला शिकवीन…' संपताच शिवानी रांगोळेच्या भावना अनावर, म्हणाली, "शेवटचा भाग…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.