महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने साऱ्यांनाच खळखळून हसवले. महाराष्ट्रातील हा असा एकमेव शो आहे ज्याने सगळ्यांच्या टेन्शवरील मात्रा दूर करण्यास भाग पाडतो. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. या कार्यक्रमातील सगळ्याच पात्रांवर चाहते भरभरून प्रेम करतात. विनोदी शैलीमुळे हे कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात.
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची भुरळ फक्त सामान्य प्रेक्षणकानंच नाही तर राजकीय पटलावर परखड भाष्य करणारे तसेच आपल्या खास वक्तृत्व शैलीने जनतेच्या मनावर राज्य करणारे मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे यांना सुद्धा हास्यजत्रा पाहण्याचा मोह आवरत नाही.(Raj Thackeray on Mhj)
एका कार्यक्रमा दरम्यान जेव्हा राज ठाकरे यांना महाराष्ट्रा मधल्या विनोदाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी लगेच नाव घेतलं ते म्हणजे हास्य जत्रेचं. जर तुम्हाला निवळ, निखळ विनोद पाहायचा असेल तर हास्यजत्रा पाहावी असा राज ठाकरे यांच्या बोलायचं उद्देश होता.

राज ठाकरे म्हणाले….(Raj Thackeray on Mhj)
हास्य जत्रा हा असा एकमेव विनोदी कार्यक्रम आहे जो लहान मुलं, वयस्कर, तरुण सगळे एकत्र बसून बघू शकतात, तसेच या कार्यक्रमात कोणावरही टीका न करता, कोणताही आक्षेपार्य विनोद न करता कार्यक्रम चालवला जातो असं देखील राज ठाकरे या वेळी म्हणाले. सातत्याने असा विनोद साकारणं साधी गोष्ट नाही असं देखील राज ठाकरे या वेळी म्हणाले.
====
हे देखील वाचा – ‘आशा भोसले नावाच्या ह्या विद्यापीठास…’महाराष्ट्र भूषण विजेत्या आशा भोसले यांच्यासाठी अवधूत गुप्तेची खास पोस्ट
====
राज ठाकरेंनी मांडलेलं मत हे कोणालाही मान्य नसेल असं होणार नाही. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या हटके विनोद शाळेने नेहमीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या प्रसिद्ध कार्यक्रमातील सगळीचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढू लागली आहे. फक्त महाराष्ट्राचं न्हवे तर संपूर्ण जगाला यातील निखळ अभिनयाने वेड लावले आहे. (Raj Thackeray on Mhj)

समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, पंढरीनाथ कांबळे अशा अनेक मात्तबरांच्या जोडीला गौरव मोरे, रोहित माने, वनिता खरात, इशा डे, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, दत्तू मोरे, निखिल बने, असे अनेक तरुण तरुणी यांच्या खांद्याला खांदा लावून काम लोकांचं मनोरंजन करण्याच्या या अठ्ठाहासात पूर्ण पणे उतरले.