शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईला लवकरच अमेरिका वारी घडवेन

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 13, 2023 | 10:11 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
prithvik pratap in usa wears kurta made his mother's sari

prithvik pratap in usa wears kurta made his mother's sari

सध्याच्या घडीला सर्वाधिक पाहिला जाणारा कॉमेडी शो म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. हास्यजत्रेच्या रूपाने अनेक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आले, त्यातलंच एक नाव म्हणजे पृथ्वीक प्रताप. हास्यजत्रेतील विविध स्किट्समधून आगळ्यावेगळ्या भूमिका करणाऱ्या पृथ्वीकची एक विशेष क्रेझ आहे. पृथ्वीकने अनेक मालिका, सिनेमे केलेत; पण त्याला खरी ओळख मिळाली ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळेच.(prithvik pratap)

पृथ्वीक सध्या हास्यजत्रेच्या सहकलाकारांसह अमेरिकेच्या दौऱ्यावर असून अनेक फोटोज त्याने आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केलेत. असाच एक रील नुकतंच पृथ्वीकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. ज्यात तो न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना दिसतोय. विशेष म्हणजे, पृथ्वीक आपल्या आईच्या साडीपासून बनवलेला कुर्ता घालून तिथल्या रस्त्यांवर मनसोक्त फिरला.

ह्या रीलसोबत त्याने एक पोस्टसुद्धा केली. ज्यात त्याने लिहिलंय, “अमेरिकेला येण्यासाठीची सगळी तयारी सुरू असताना आई अचानक म्हणाली ‘मला पण घेऊन चल ना अमेरिकेला’ आणि तिच्या या वाक्यावर तिला काय उत्तर देऊ हे मला कळेच ना… खूप विचार केला आणि लक्षात आलं की आता सध्या तरी आईला प्रतिकात्मक रूपे अमेरिकेत घेऊन जाऊ शकतो. म्हणून आज न्यूयॉर्क शहर फिरत असताना आईच्या साडी पासून बनवलेला कुर्ता घातला आणि सगळं शहर पिंजून काढलं. तेवढच आपलं आई आपल्यासोबत असल्याची फीलिंग.”

“बाय द वे इथे अमेरिकेत तसं वातावरण थोडं गोंधळात पाडणारं आहे. मध्येच ऊन लागतं, मध्येच पाऊस त्यामुळे तब्येतीवर होणारा परिणाम… त्यात सततचा प्रवास, लागोपाठ शो यामुळे आलेला थकवा… हे सगळं आज जरा कमी झालं… कारण ऊन, पाऊस, थकवा, आजारपण हे आपलं काहीच बिघडवू शकत नाही जर आपण आईच्या पदराखाली असू. ❤️ मिस यू अम्मा ❤️ तळटीप : लवकरच आईला अमेरिका वारी घडवेन त्यामुळे चिंता नसावी” पृथ्वीकच्या या रीलला चाहत्यांसह अनेक कलाकारांनी भरभरून प्रेम दिलंय. (prithvik pratap in usa)

हे देखील वाचा – ‘म्हणून मी कांबळे आडनाव लावत नाही’- ५ मुलींनी दिला अभिनेता पृथ्वीक प्रतापला नकार

पृथ्वीकला इथपर्यंत पोहोचण्यासाठी बराच स्ट्रगल करावा लागला. त्याने अनेक ऑडिशनही दिले, तेव्हा त्याला रिजेक्शनचा सामना करावा लागला. पण शोच्या एका सीझनचा विनर झाल्यानंतर पृथ्वीक रातोरात स्टार झाला. पृथ्वीकने हास्यजत्रेबरोबरच ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेतही झळकला आहे.

Tags: maharashtrachi hasy jatraprithvik pratapprithvik pratap in usasony marathi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
hardik & akshya in jejuri khandoba darshan

हार्दिक-अक्षयाने घेतले खंडोबाचे दर्शन; दर्शनावेळी अक्षयाने नेसली आईची २५ वर्ष जुनी साडी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.