Mata Sanman 2025 : मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबविश्वातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या मटा सन्मान २०२५ या सोहळ्याकडे मनोरंजनविश्वाचे लक्ष लागले होते. अखेर काल विलेपार्ले पश्चिमेच्या मुकेश पटेल सभागृहात सायंकाळी हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर, आणि तंत्रज्ञ मंडळींच्या साक्षीने कलाकारांच्या कर्तृत्वाचा सन्मान या मंचावर झाला. यावेळी मराठी वेबविश्वातील एका लोकप्रिय वेबसीरिजवर पुरस्कारांचा पाऊस पडला. हो. मीडिया वन सोल्युशन्स आणि इट्स मज्जा प्रस्तुत पाऊस या वेबसीरिजने यंदाच्या मटा सन्मान २०२५ मध्ये हवा केली असल्याचं पाहायला मिळालं.
पाऊस आणि प्रेमाचा सुंदर मिलाप असलेली ‘इट्स मज्जा’ची ‘पाऊस’ ही सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेबसीरिजमधून प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणाऱ्या सायली आणि विशालची लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. Wrong Number ने सुरु झालेली सायली-विशाल यांची Right Lovestory प्रेक्षकांना खूपच भावली. या दोघांमधील प्रेमाचे काही खास क्षण प्रेक्षकांनी चांगलेच एन्जॉय केले. या सीरिजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आणि आता या सीरिजने ‘मटा सन्मान २०२५’ मध्ये ही घवघवीत यश मिळवले.
आणखी वाचा – लाडक्या बहिणींची फसवणूक, नक्की खरं काय?
मटा सन्मान २०२५ मध्ये पाऊस या वेबसीरिजला सर्वोत्कृष्ट लेखन हा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार या वेबसीरिजचे लेखक नितीन पवार, नितीन वाडेवाले यांना मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आरती बिराजदार हिने पटकवला. आरतीलाही हा पुरस्कार पाऊस या वेबसीरिजसाठी मिळाला. पाऊस वेबसीरिजसाठी मिळालेले हे पुरस्कार पाहता चाहतेमंडळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आरतीसह या वेबसीरिजच्या लेखकांचंही कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – ३७व्या वर्षीही ‘तारक मेहता…’मधील बबिता अविवाहित, अजूनही लग्न केलं नाही कारण…
१९ भागांमध्ये या सीरिजची सांगता झाली. , ‘पाऊस’ या सीरिजची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’ या गाजलेल्या सिरिजच्या नितीन पवार यांनी केले आहे. तर या सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी केली. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड म्हणून अंकिता लोखंडेने बाजू सांभाळली. ‘पाऊस’ ही लोकप्रिय सीरिज ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर तुम्हाला पाहता येणार आहे.