Kartiki Gaikwad Brother Wedding : सध्या सिनेसृष्टीत कलाकार मंडळींची लगीनघाई विशेष चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या आयुष्यात लग्नगाठ बांधत नवं पाऊल टाकलं. अशातच मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या एका शाही विवाहसोहळ्याच्या फोटोंनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हा शाही विवाहसोहळा म्हणजे गायकवाड कुटुंबातील कौस्तुभचा. संगीत क्षेत्रात गायकवाड कुटुंब अग्रस्थानी आहे. कल्याणजी गायकवाड यांचे चिरंजीव कौस्तुभच्या लग्नाची धामधून गायिका कार्तिकी गायकवाडने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. कार्तिकी गायकवाड सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच काही दिवसांपासून कार्तिकी भावाच्या लग्नात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कार्तिकीने तिच्या भावाच्या शाही विवाहसोहळ्याची झलक इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली आहे. कौस्तुभ आणि काव्या यांचा लग्न सोहळा”, असं कॅप्शन देत या राजेशाही थाटमाटाची झलक पाहून नेत्र सुख मिळत आहे. यावेळी कार्तिकीचा भाऊ कौस्तुभ पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये खूप देखणा दिसत आहे. तर कार्तिकीच्या वहिनीने लाल रंगाचा डिझाइनर लेहेंगा परिधान केला आहे. तीदेखील या लूकमध्ये आणि भरजरी दागिन्यांमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
कार्तिकीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या भावाची घोड्यावर बसून मिरवणूक मंडपात आणलेली दिसत आहे. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय, मित्र-परिवार यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कार्तिकीने तिच्या इंस्टाग्रामवर भाऊ कौस्तुभच्या लग्नातील खास लूकचे आणि लग्नविधीचेही फोटो शेअर केले आहेत. यामध्येही कार्तिकीच्या भावाच्या लग्नाचा शाही थाटमाट पाहायला मिळाला.कार्तिकीने भावाच्या लग्नात करवली बनून खूप मिरवलं. नवऱ्या मुलीलाही मागे टाकेल असा तिचा लक्षवेधी लूक चर्चेत राहिला.
लग्नात कार्तिकीने पांढऱ्या रंगाची आणि भगवा काठ असलेली नऊवारी साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा डिझाइनर कॉन्ट्रास्ट ब्लाउज परिधान केला होता. डायमंडची ज्वेलरी, वेस्टर्न मंगळसूत्र हातात हिरवा चुडा, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर अशा या कार्तिकीच्या मराठमोळ्या लूकवरुन नजर हटत नव्हती.