शनिवार, ऑगस्ट 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्या एका मावशींच्या हातून…”, मराठी अभिनेत्रीने सांगितला स्वामींचा अनुभव, म्हणाली, “रडत रडत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 22, 2025 | 4:07 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aditi Sarangdhar

"आमच्या एका मावशींच्या हातून…", मराठी अभिनेत्रीने सांगितला स्वामींचा अनुभव, म्हणाली, "रडत रडत…"

Aditi Sarangdhar : स्वामींची प्रचिती आली असं अनेकदा कानावर येतं. असे अनेक बरेच कलाकार आहेत ज्यांनी आजवर स्वामींबाबत त्यांना आलेले अनुभव शेअर केले आहेत. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही स्वामींचा एक अनुभव नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शेअर केला. ही अभिनेत्री म्हणजे अदिती सारंगधर. अदितीने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सोशल मिडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच अदितीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आलेला स्वामींचा अनुभव शेअर केला आणि ती स्वामीभक्त असल्याचं स्पष्ट केलं.

अदितीने ‘मज्जा पिंक’ चॅनेलच्या ‘हीलिंग सर्कल विथ वनश्री’ या पॉडकास्टला भेट दिली. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील अनेक अनुभव, किस्से सांगितले. यावेळी तिने स्वामींचा अनुभव सांगितला. अदिती म्हणाली, “माझा अनुभव आहे, जो मी कधीच सार्वजनिकरित्या शेअर नाही केला. माझं कॉलेज संपलेलं आणि वादळवाटचं शूटिंग सुरु झालेलं. मी परीक्षा देऊन येत होते आणि खूप रडत होते. ट्रेनमध्ये खिडकीपाशी बसून रडत होते. समोर एक अनोळखी व्यक्ती होती, तिने मला विचारलं काय झालं? तिने असं विचारताच मला आणखी रडू आलं. तर ती म्हणाली, ‘काही नाही गं! स्वामी बरं करतील.’ ती स्वामींच्या मठात जाऊन आलेली. ती माझी नंतर चांगली मैत्रीण झाली. भारती नाव तिचं. तिने मला स्वामींचा अंगारा दिला, प्रसाद दिला आणि मी परीक्षा दिली. माझं ग्रॅज्युएशन झालं”.

आणखी वाचा – घटस्फोटाच्या तीन महिन्यांतच मराठी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, केळवणाचा व्हिडीओ समोर

ती पुढे म्हणाली, “मी कठीण काळात असताना मला भारतीचा फोन आला. आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो, घरी जेवायलाच ये असं तिनं मला सांगितलं. तिने मला स्वामींची छोटुशी मूर्ती दिली. ती मूर्ती घरात आणली, स्थापना केली. हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तीच मूर्ती मी आताच्या घरात आणली आणि ती मूर्ती आमच्या एका मावशींच्या हातून तुटली. मला इतकं वाईट वाटलं, मी भारतीला रडत रडत फोन केला. ती बँकेत कामाला होती, तिने हाफ-डे घेतला. स्वामींची नवीन मूर्ती घेतली, मठात जाऊन त्यावर अभिषेक केला आणि ती मूर्ती घेऊन दुपारी माझ्याकडे आली. स्वामींना यायचं होतं माझ्या घरी. अजूनही कठीण परिस्थिती आली तरी ते असतात माझ्यासोबत”, असा स्वामींचा अनुभव सांगताना अदितीने पुढे सांगितलं.

Tags: aditi sarangdharentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
harman sidhu punjabi singer dies

पंजाबी संगीतसृष्टीला मोठा धक्का, ३७ वर्षीय लोकप्रिय गायकाचे रस्ता अपघातात निधन, गाण्याच्या शुटिंगनंतर परतत असताना…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.