मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुपाली भोसलेच्या नव्या गाडीचा अपघात, मोठं नुकसान पण अभिनेत्री सुखरुप, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 29, 2025 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 Rupali Bhosle Mercedes car accident

रुपाली भोसलेच्या नव्या गाडीचा अपघात, मोठं नुकसान पण अभिनेत्री सुखरुप, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

 Rupali Bhosle Mercedes car accident : मालिकाविश्वातील कलाकार हे नेहमीच त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. अभिनयाच्या जोरावर ते प्रेक्षकांचं मनं जिंकतात आणि विशेष लक्ष ही वेधून घेतात. पण कलाकार फक्त त्यांच्या भूमिकांमुळेच नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही बरेचदा चर्चेत असलेले पाहायला मिळाले आहेत. अशाच सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक म्हणजे रुपाली भोसले. रुपालीने वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिथे ती आपले फोटो-व्हिडीओ आणि नवीन कामाबाबत अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना या भूमिकेमुळे रुपालीला लोकप्रियता मिळाली. रुपालीच्या खलनायिकेच्या भूमिका विशेष गाजल्या. अभिनयाबरोबरच रुपाली तिच्या वैयक्तिक अपडेटमुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. अलीकडेच रुपालीने तिच्या नव्या गाडीबाबत एक महत्त्वाची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. यावर्षी जानेवारीत तिने महागडी मर्सिडीज गाडी खरेदी केली होती. मात्र, दुर्दैवाने या गाडीचा अपघात झाला आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या अडीच वर्षानंतर सुप्रसिद्ध गायिका होणार आई, पारंपरिक अंदाजात केलं डोहाळ जेवण, फोटो व्हायरल

रुपालीने स्वतः इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हा व्हिडीओ शेअर केला असून, ‘अपघात झाला, वाईट दिवस’ अशा मोजक्या शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. तिने या व्हिडीओसह तुटलेला हार्ट इमोजीही शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये गाडीचं झालेलं नुकसान स्पष्ट दिसत आहे. या अपघाताबाबत रुपालीने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नसली तरी, तिचे अनेक चाहते काळजीत पडले आहेत.

आणखी वाचा – खजूर, कुरमुरे विकले, आर्थिक संकटाने घर गमावलं आणि…; ‘ठरलं तर…’च्या अर्जुनचा खऱ्या आयुष्यातील स्ट्रगल, आजही मालिकेसह करतो कॉर्पोरेट जॉब

दरम्यान, रुपालीच्या पर्सनल मेकअप आर्टिस्टनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “रुपाली भोसले मॅम मेजर अ‍ॅक्सिडेंटनंतरही तेवढ्याच स्ट्रॉन्गली उभ्या राहिल्या. #STRONGWOMEN” असं लिहून तिने भावना शेअर करत रुपालीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. सध्या रुपाली लपंडाव या नव्या मालिकेतून छोटा पडदा गाजवताना दिसत आहे. या मालिकेत ती सरकार ही खलनायकी भूमिका साकारताना दिसत आहे. आता रुपालीची ही नवी भूमिका मालिकेत कोणते ट्विस्ट अँड टर्न आणणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: marathi actressrupali bhosale car accidentrupali bhosle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
child actor veer sharma

टीव्ही अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा आगीत होरपळून मृत्यू, धाकटा होता प्रसिद्ध बालकलाकार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.