Mrinal Kulkarni Husband Birthday : आपल्या दमदार अभिनयाने व निखळ हास्याने मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपली छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. त्यांनी विविध भूमिका साकारत सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. लहान मुलांच्या ‘सोनपरी’ म्हणून असो किंवा महिलावर्गाच्या अवंतिका असोत त्यांनी प्रत्येक भूमिका अजरामर केली आहे. व्यावसायिक आयुष्याबरोबर अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. त्या सोशल मीडियाद्वारे पती, मुलाबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात. पती रुचिर यांच्याबरोबरचे बरेच फोटो मृणाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
मृणाल यांनी लव्ह मॅरेज केलं आहे हे अनेकांना ठाऊक नसेल. फक्त ११वी मध्ये असताना त्या त्यांच्या पतीच्या प्रेमात पडल्या होत्या आणि प्रपोज न करता त्यांनी कबुलीही दिली होती. १९९०मध्ये मृणाल यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. वयाच्या १९व्या वर्षी मृणाल यांनी लग्न केलं. मृणाल-रुचिर यांच्या लग्नाला ३४ वर्ष झाली आहेत. मृणाल-रुचिर यांचं एकमेकांवर तितकंच प्रेम असल्याचं त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतं. आज मृणाल यांचे पती रुचिर यांचा वाढदिवस आहे. नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मृणाल यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – राजपाल यादव यांच्या वडिलांचे निधन, दिल्लीत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

मृणाल यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “आमचं कुटुंब एकमेकांशी घट्ट जोडलेलं आणि रुचिर त्याचा एक अविभाज्य भाग. अगदी फार फार वर्षापासून किस्से सांगून आम्हा सर्वांना खळाळून हसवणारा, धमाल, खोड्या करणारा, आरडाओरडा करुन हक्कानी कौतुक वसूल करणारा, अतिशय मनापासून दाद देणारा आणि क्षणात गंभीर होऊन अगदी योग्य असा सल्ला देणारा. आईच्या आजारपणात थोरला बनून त्याने आम्हा सर्वांना आधार दिला. तेव्हा त्याचं एक वेगळंच रूप जाणवलं. अनेक वर्षे एकत्र असलो तरी आपण एकमेकांना सतत नव्याने उमगत असतो हेच खरं. रूचिर, तू असा हात घट्ट धरला आहेस हे फार फार सुखाचं आहे. तुला जन्मदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा”.
आणखी वाचा – सैफ अली खानचा वैद्यकीय अहवाल समोर, आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार नाही? मोठा युटर्न
मृणाल यांचे पती रुचिर हे पेशाने वकील आहेत. तर मुलगा विराजस याने आईच्या पावलावर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीत करिअरची सुरुवात केली आहे. अभिनय व दिग्दर्शन अशी दुहरी बाजू तो सांभाळत आहे. तर सून शिवानी रांगोळेही मालिका व सिनेविश्वात सक्रिय आहे. सध्या शिवानीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका तुफान गाजतेय.