बाप लेक हे नातं इतर सगळ्या नात्यांपेक्षा वेगळं आहे. थोडासा अबोला, थोडीशी मैत्री, थोडासा राग, थोडीशी भीती अशा विविध अंगी गुणांनी बनलेलं हे नातं प्रत्येकाच्या घरात पहायला मिळतं. लेक जन्माला आल्यापासून ते अगदी तिची सासरला पाठवणी करेपर्यंत वडील तिचे प्रत्येक लाड पुरवत असतात. इतकंच नव्हे तर सासरी गेल्यावरही लेकीची चिंता ही वडिलांना लागूनच राहिलेली असते. प्रत्येक मुलीचं तिच्या वडिलांबरोबरचं खास बॉण्डिंग हे असतंच. सर्वसामान्यचं नव्हे तर अशा काही कलाकार जोड्या आहेत ज्यांचं आपल्या वडिलांबरोबरच खास बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळतं. (Aishwarya Narkar On her Father)
अशातच ‘फादर्स डे’च्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या वडिलांबरोबरचा शेअर केलेला व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर त्यांच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या यांच्या सौंदर्याने साऱ्यांना भुरळ घातली आहे. लवकरच वयाची पन्नाशी गाठणाऱ्या या अभिनेत्रीचं सौंदर्य तरुणाईला लाजवेल असं आहे. व्यायाम, योगा करत त्या नेहमीच स्वतःला फिट ठेवत असतात. सोशल मीडियावरही त्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
आणखी वाचा – पारूचं मन आदित्यमध्ये गुंततंय, एकमेकांसह फिरायलाही गेले, अखेर देणार का प्रेमाची कबुली?
अनेकदा त्या मालिकेच्या सेटवरील सहकलाकारांबरोबरच्या रील चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यांचे हे रील व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही रील व्हिडीओ त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी शेअर केली आहे. ऐश्वर्या नारकर यांनी ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा देण्यासाठी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांचे आई-बाबा दिसत आहेत.
या व्हिडीओला “जिंदगी तेरे नाम” हे गाणं अभिनेत्रीने जोडलं आहे. “माझ्या आयुष्यातला माणूस (The man in my life) #बाबा. बाबांची पल्लू…” असं सुंदर कॅप्शन ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडीओवर चाहतेमंडळी लाईक्स व कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.