शुक्रवार, ऑगस्ट 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बांदेकरांच्या घरी लगीनघाई! केळवणाचे फोटो समोर, लवकरच अडकणार लग्नबंधनात

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 8, 2025 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Soham Bandekar Video

बांदेकरांच्या घरी लगीनघाई! केळवणाचे फोटो समोर, लवकरच अडकणार लग्नबंधनात

Soham Bandekar Video : मराठी मनोरंजनसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच लोकांनी आपल्या प्रेमाची कबुली देत लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती चाहत्यांसह शेअर केली. नुकतेच मालिकाविश्वातील अभिनेता मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांचा केळवण समारंभही थाटामाटात पार पडला. यापाठोपाठ आता मराठी मनोरंजन सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता आदेश बांदेकर आणि त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर सुद्धा लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. बरेच दिवसांपासून सोहमच्या लग्नाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारी ही बांदेकरांची सून होणार असल्याचं समोर आलं आहे. पूजा आणि सोहम यांनी अद्याप प्रेमाची कबुली दिलेली नाही. पण आता या नव्या जोडीची लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे कारण सोहम बांदेकरच्या सिनेसृष्टीतील लाडक्या मावश्या म्हणजेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या जिवलग मैत्रिणींनी मिळून सोहम बांदेकरचे केळवण पार पाडले.

आणखी वाचा – पारू-आदित्यला प्रॉपर्टीचा हिस्सा मिळणार का?, अहिल्यादेवींचा मोठा निर्णय, मालिकेत ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Aaswad Upahar & Mithaigriha (@aaswaddadar)

सोशल मीडियावर सध्या सोहमच्या केळवणाचे फोटो समोर आले असून त्यावर चाहत्यांनीअभिनंदनचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, अभिजीत केळकर, आणि पूर्वा गोखले यांनी मिळून सोहमचे केळवण पार पडले.आस्वाद उपहार या हॉटेलमध्ये सोहमचे केळवण पार पडले. या हॉटेलच्या सोशल मीडिया पेजवर केळवणाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, “सोहम बांदेकर…. सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांचा मुलगा…. लवकरच हसत हसत आनंदाने लग्नबंधनात अडकणार आहे. म्हणून त्याच्या सगळ्या मावश्यांनी सोहमचे केळवण पार पाडले आहे”, असं लिहीत त्यांनी सुंदर असे फोटो पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा – कतरीना कैफ-विकी कौशलच्या घरी चिमुकल्याचे आगमन, ४२व्या वर्षी अभिनेत्री झाली आई, कौतुकाचा वर्षाव

केळवणाचे फोटो पाहून आता सोहम आणि पूजाच्या लग्नाची खात्री पटली आहे. त्यामुळे ही जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. केळवणाच्या या समोर आलेल्या फोटोंवरुन सोहमची लगीनघाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पोस्टवर अनेकांनी त्याला शुभेच्छाही दिलेल्या पाहायला मिळत आहेत.

Tags: marathi actorsoham bandekarwedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
Dipika kakar liver cancer

९ सेमी ट्यूमर आणि किडनी स्टोन; दीपिका कक्करवर उपचार सुरु, २२% यकृताचा भागही काढला, डॉक्टरांनाही बसला धक्का

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.