शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : असा पार पडला अनंत-राधिका यांचा ‘शुभ आशीर्वाद’ सोहळा, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केलं होस्टिंग, खास लुकनेही वेधलं लक्ष

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 15, 2024 | 7:15 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
sharad kelkar at ambani shubh aashirwad

Video : असा पार पडला अनंत-राधिका यांचा ‘शुभ आशीर्वाद’ सोहळा, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केलं होस्टिंग, खास लुकनेही वेधलं लक्ष

सध्या अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम अजूनही सुरु आहे. दोघांचाही विवाह १२ जुलै रोजी मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. जॉन सिना, कर्दाशियन बहिणी, जस्टीन बीबर असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार उपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे बॉलीवूडमधीलही सर्व कलाकार अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले होते. लग्न झाल्यानंतर पुढील दोन दिवसही हा सोहळा सुरु होता. १३ जुलै  व १४ जुलै रोजी दोघांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. (sharad kelkar at ambani shubh aashirwad)

 राधिका व अनंत यांना आशिर्वाद देण्यासाठी अंबानी कुटुंबीयांनी ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यालाही बॉलीवूड तसेच इतर क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. अनेक कलाकारांचे ग्लॅमरस लूक समोर आले आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमांमधील धमाल-मस्तीचे व्हिडीओदेखील समोर आले. याचबरोबर आता नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे मराठी माणसांची मान उंचावली आहे.

आणखी वाचा – अनंत-राधिका यांच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांबरोबर फोटो काढणारी ही मुलगी नक्की आहे तरी कोण?, अंबानी कुटुंबाबरोबर काय आहे कनेक्शन?

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

अंबानी कुटुंबाने आयोजित केलेल्या या सोहळ्याचे होस्टिंग हे अभिनेता शरद केळकरने केले होते. या सोहळ्याच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी ही शरद केळकरकडे होती. त्याचे होस्टिंग करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये त्याच्या आवाजाबरोबरच त्याच्या लूकची चर्चादेखील अधिक रंगली. शरदचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “शरदने मराठी लोकांची मान उंचावली आहे”, तसेच दुसऱ्या एकाने लिहिले की, “याचा आवाज एकदम भारी आहे”.

आणखी वाचा – Video : क्रांती रेडकरने पतीसह घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, अभिनेत्रीच्या संस्कारांचं होतंय कौतुक

शरदच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने आजवर अनेक हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाबरोबरच आवाजाचीही प्रशंसा अधिक केली जाते. त्याचप्रमाणे शरद हा अनेक चित्रपटांचे डबिंगदेखील करतो. ‘बाहूबली’ चित्रपटातील मुख्य भूमिकेला त्याने त्याचा आवाज दिला होता. यावेळी त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुकही झाले होते.      

Tags: anat ambaniradhika merchantsharad kelkarshubh aashirvaad
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
katrina kaif on vicky kaushal

कतरिना कैफ पती विकी कौशलला ‘या’ स्पेशल नावाने मारते हाक, कारणही आहे खूपच खास, नावाचा नेमका अर्थ काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.