रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिवंगत नेते विलासराव देशमुखांची दोन्ही मुलं विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, रितेशचा भावांना पाठिंबा, म्हणाला, “अभिनंदन आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 30, 2024 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Actor Riteish Deshmukh wished his brothers Amit and Dheeraj all the best for the upcoming vidhansabha elections 2024

रितेश देशमुखने भाऊ अमित व धीरज यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं व महत्त्वाचं नाव म्हणजे दिवंगत नेते विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेले विलासराव देशमुख आजही अनेकांच्या लक्षात आहेत. राजकारणातले राजहंस अशी ओळख असणाऱ्या विलासराव देशमुख यांची भाषण शैली आणि शब्दांवर असलेली पकड याची सामान्यांना भुरळ पडत असे. विलासराव देशमुख हे विरोधी पक्षातही लोकप्रिय होते. ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदापासून कारकिर्दीला सुरुवात केलेल्या विलासरावांनी मुख्यमंत्री पदापर्यंत आपला राजकीय प्रवास केला. विलासराव देशमुख म्हणजे काँग्रेसचे स्टार प्रचारक. एकहाती सभा खेचून आणण्याचे त्यांचे कौशल्य होते. (Riteish Deshmukh wished his brothers Amit and Dheeraj)

विलासराव देशमुखानंतर अमित देशमुख व धीरज देशमुख ही त्यांची मुलं त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. अमित २००९ पासून लातूर शहराचे आमदार आहेत. तर त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. अमित व धीरज यांच्याप्रमाणे विलासरावांचा चिरंजीव रितेश देशमुख राजकारणात सहभाग घेतला नसला तरीदेखील त्यांचे दोन्ही भाऊ अमित व धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय आहेत आणि आपल्या दोन्ही भावांना रितेश कायमच साथ देत आला आहे.

आणखी वाचा – “काय दिवे लावणार कुणास ठाऊक?”, पत्नीने कुशल बद्रिकेला चिडवलं, अभिनेताही म्हणाला, “संध्याकाळी…”

आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात अमित व धीरज उतरले आहेत. अमित आणि धीरज या देशमुख बंधूंना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने रितेशने दोघांना पाठिंबा दिला आहे. तसेच आपल्या दोन्ही भावांना त्यांनी यानिमित्ताने शुभेच्छाही दिल्या आहेत. अमित व धीरज यांनी त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरतानाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी दोघांबरोबर त्यांची आईही होती. हाच फोटो रितेशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा अमित व धीरज भैय्या”.

आणखी वाचा – “माझ्या आईच्या साडीने पेट घेतला अन्…”, ‘नवरी मिळे…’ फेम लीलाने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “फटाक्यामुळे…”

दरम्यान, लातूर शहरात अमित देशमुखांविरुद्ध भाजपाने शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्चना पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अर्चना पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरच त्या अमित देशमुखांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार ही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे लातूरमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Tags: Amit and Dheeraj Vidhan Sabha Election Candidacymarathi entertainment newsriteish deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Sydney Sweeney To Launch Soap 
Lifestyle

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

मे 31, 2025 | 2:00 pm
ashok saraf padma shri
Entertainment

“माझा अपघात झाला तेव्हा…”, पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफांचा कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, “लोकांनी तर…”

मे 31, 2025 | 12:57 pm
Next Post
Akshay Kumar Donate

आयोध्येतील माकडांसाठी अक्षय कुमारचा मदतीचा हात, आई-वडील व सासऱ्यांच्या नावाने दान केले कोटी रुपये कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.