Manoj Kumar Wife Shashi Goswami : बॉलिवूड अभिनेता मनोज कुमार यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळला. ८७ वर्षीय या अभिनेत्याने उद्योगविश्वात बराच वेळ घालवला. अनेक सुपरहिट चित्रपटही त्यांनी दिले. त्यांच्या देशभक्तीने साऱ्यांना वेड लावलं. ५ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनतर त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. यावेळी उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. आणि प्रत्येकाने त्यांच्या आत्म्याच्या शांततेसाठी प्रार्थना केली. पण त्यांची पत्नी शशी गोस्वामी यांना पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
मनोज कुमारची पत्नी शशी आणि मुलगा कुणाल गोस्वामी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये, पांढऱ्या रंगाचा सलवार सूटमध्ये शशी गोस्वामी दिसल्या. यावेळी पतीला पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला दिसला. मनोज कुमार यांची पत्नी रडत त्यांना निरोप देत होती. त्यांच्या पार्थिवाला मिठी मारुन ती ढसाढसा रडताना दिसली. यापुढे तिला त्यांच्याशी बोलता येणार नाही यामुळे तिला प्रचंड वाईट वाटत होतं. हे पाहिल्यानंतर त्यांचा मुलगाही अश्रू थांबवू शकला नाही. परंतु आपल्या आईला धैर्य देण्यासाठी त्याने स्वत: ला कमकुवत होऊ दिले नाही.
आणखी वाचा – CID च्या एका एपिसोडसाठी किती पैसे घेतात शिवाजी साटम?, एकूण कमाई होती…
मनोज कुमार शशीला एका पार्टीत भेटले होते. त्या काळात, अभिनेता दिल्ली युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये शिकत होता. यानंतर, दोघांची भेट झाली. आणि पुढील गोष्टी सुरु झाल्या. ते महाविद्यालयाच्या छतावर एकमेकांना भेटायचे, याबाबत कोणालाही माहित नव्हते. मग त्यांनी लग्न केले आणि एका मुलाला जन्म दिला. असे म्हटले जाते की अभिनेत्याने सुमारे १७० कोटींची मालमत्ता सोडली आहे. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार मनोज कुमार यांच्या एकूण मालमत्तेचा अंदाज अंदाजे २० दशलक्ष डॉलर्स होता. म्हणजेच सुमारे एक कोटी रुपये. त्यांनी ही मालमत्ता भारतीय सिनेमात दीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीसह बनविली, जिथे त्यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून काम केले.
आणखी वाचा – नऊ वर्षांचा संसार मोडला; मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध कपलचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत दिली माहिती
‘दैनिक जागरन’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत त्यांनी आपली प्रेमकथा सांगितली आणि म्हणाली, “पदवीच्या दिवसात मी जुन्या दिल्लीतील मित्राच्या घरी जात असे आणि तिथेच मी पहिल्यांदा शशीला पाहिले. देवा शपथ, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात वाईट हेतूने कोणत्याच मुलीला कधीच पाहिले नाही, परंतु शशीमध्ये अशी जादू होती की मी तिच्या चेहऱ्यावरुन माझी नजर हटवू शकलो नाही. आणि दीड वर्षांपर्यंत, आम्ही दोघांनीही फक्त दूरवरुन एकमेकांना पाहिले. कारण त्यावेळी आमच्यापैकी कोणीही एकमेकांशी बोलण्याचे धाडस केले नाही”.