‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. या मालिकेत अनिताने सकारलेलं गृहिणीचं पात्र लोकांना आपलंस वाटलं. या मालिकेनंतर अनिता दातेने काही नाटक, चित्रपटांतून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच अभिनेत्री नुकतीच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अनिता दाते कलर्स वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ या नवीन मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अनिता आनंदी हे पात्र साकारतअसून तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. अशातच अभिनेत्री पुन्हा एकदा कौतुकाची धनी झाली आहे आणि याचं कारण म्हणजे अभिनेत्रीने नुकतीच एक आलिशान कर खरेदी केली आहे. अनिता सोशल मीडियावर आपले अनेका फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
आणखी वाचा – एकाच हॉटेलमध्ये आहेत अप्पी-अर्जुन, अमोलची त्याच्या वडिलांबरोबर भेट होणार का?, मालिकेमध्ये मोठा ट्वीस्ट
अशातच अनिताने शेअर केलेला हा नवीन व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नवीन गाडी घेतल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अनिताने या खास व्हिडीओ शेअर करत त्याखाली “नवीन कार खरेदी केल्याचा माझा आनंद तुमच्याबरोबर शेअर करत आहे” अशा आनंदी भावनाही शेअर केल्या आहेत.
दरम्यान, अनिताने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच त्याच्या या व्हिडीओखाली मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी तिचे कौतुक करत तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. मयूरी वाघ, श्रुती मराठे, प्रियदर्शन जाधव, किशोरी आंबिये, अक्षर कोठारीसह अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी अनिताचे कौतुक केले आहे.