कलाकार म्हटलं की अभिनयाच्या बाबतीत त्यालाही परीक्षा द्यावीच लागते. स्क्रिप्ट समोर दिसलं की ते वाचून कलाकारालाही निर्णय घेण्यासाठी विचार करावा लागतो. होकार द्यायचा की नकार, पात्र आवडलं की नाही याचा निर्णय घेणं कलाकाराला घ्यावाच लागतो. मोठा दिग्दर्शक आहे किंवा निर्माता हे म्हणून केवळ नाती जपण्यापुरती त्या चित्रपटात काम करणं हे एखाद्या खऱ्या कलावंताच्या तत्वात बसत नाही. असाच काहीसा प्रसंग ओढवला होता अभिनेते महेश कोठारे यांच्यावर. महेश कोठारे आज नामवंत दिग्दर्शक, निर्माते जरी असले तरी त्या काळच्या एका दिग्गज दिग्दर्शकाला महेश कोठारेंनी दिलेल्या उत्तराने धक्काच बसला. याबाबतचा एक किस्सा ‘डॅम इट आणि बरंच काही’ या पुस्तकात त्यांनी मांडलाय.(Mahesh Kothare Rejected The Film)
दिग्दर्शक तोरणे यांच्यासोबत महेश कोठारे यांनी अनेक चित्रपट केले. मात्र पाचव्या चित्रपटाची जेव्हा त्यांना ऑफर करण्यात आली तेव्हा मात्र कोठारेंनी पाऊल उचलल. तोरणेंच्या चित्रपटाची ऑफर आलीय हे जेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नी नीलिमा यांना सांगितलं तेव्हा त्यांनी महेश कोठारे यांना प्रश्न केला की, आजपर्यंत त्यांनी तुला ज्या भूमिका ऑफर केल्या, त्या तुझ्या टॅलेंटला न्याय देणाऱ्या होत्या का? असं म्हणत नीलिमा यांनी महेश यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं. त्यानंतर महेश कोठारे तोरणे यांना भेटायला गेले. कोठारेंनी तोरणेंना विचारलं, ‘तोरणेसाहेब जरा आपल्या चित्रपटाचं स्क्रिप्ट वाचहयाला मिळालं तर बरं होईल. अरे घे कि वाच निवांत असं म्हणत त्यांनी स्क्रिप्ट हातात ठेवली.
आणि असं काही घडलं
त्यानंतर संपूर्ण रात्र जागून कोठारेंनी ती स्क्रिप्ट वाचली. आणि स्क्रिप्ट वाचल्यानंतर कोठारेंची साफ निराशा झाली. याबाबत बोलताना त्यांनी लिहिलंय, ही स्क्रिप्ट वाचल्यावर लेखनाच्या बाबतीत मला ही भूमिका अगदीच साधारण वाटली होती. शिवाय या चित्रपटात माझ्या वाट्याला तिसरीच कोणी नायिका दिली होती. आणि या सगळ्या गोष्टी मला खटकल्या होत्या. शिवाय इतर चित्रपटांमध्ये मला आव्हानात्मक भूमिका मिळत असताना मी आता दुय्यम दर्जाच्या साईड भूमिका साकारू नयेत हे नीलिमाने मला स्पष्ट सांगितलं.(Mahesh Kothare Rejected The Film)
दुसऱ्या दिवशी कोठारे अगदी सकाळी मी तोरणेना भेटायला निघालो तेव्हा तोरणे आपल्या रूममध्ये नुकतेच बसले होते. तेव्हा आत जाऊन त्यांना भेटण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हत. महेश कोठारे त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले, “सर, हे तुमचं स्क्रिप्ट!” यावर तोरणेंनी विचारलं, “हं, कसं वाटल?” यावर महेश म्हणाले, सर, मला ही फिल्म नाही करायची!” माझ्या या वाक्यानं तोरणे क्षणभर दचकलेच. त्यांना माझ्याकडून असं काहीतरी उत्तर येईल याची अजिबात अपेक्षा नव्हती; कारण त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीतला प्रत्येक कलाकार तोरणेच्या चित्रपटात काम करण्यास इच्छुक होता. त्यामुळेच माझ्या या उत्तरानं तोरणच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
हे देखील वाचा – शेफ होण्याआधी मामांचा मुलगा करत होता ‘हे’ काम
माझं उत्तर ऐकून तोरणे म्हणाले, “काय? डोकंबिक फिरलंय का तुझं महेश? फिल्म नाही करायची म्हणजे?”, यावर कोठारे स्पष्टच बोलले, “सर, मला स्क्रिप्ट वाचताना मजा नाही आली! तोरणेंच्या चेहऱ्यावरच्या नाराजीनं आता पुढचा प्रवास सुरू केला होता. यावर थोडं चिडून तोरणे म्हणाले, “काहीतरी काय बोलतो आहेस तू? महेश, तू स्वतःला समजतोस तरी कोण ?”

म्हणून कोठारेंनी…. (Mahesh Kothare Rejected The Film)
कोठारेंचा नकार तोरणेनी चांगल्या अर्थी घेतला नाही. ते सगळ्यांसमोर त्यांच्यावर भडकले. त्यांनी कोठारेंचा भरपूर पाणउतारा केला. खूप काही बोलले. याच वेळी या चित्रपटाचे कॅमेरामन रत्नाकर लाड यांचं नेमकं तिथे आगमन झालं. हा चित्रपट नाकारीत असल्याचं तोरणेनीच त्यांना सांगितलं. तेव्हा लाड यांनी महेश हा चित्रपट चांगला असल्याचं सांगून मन वळविण्याचा प्रयत्न केला. याबाबत बोलताना महेश म्हणाले, लाड यांच्याशी माझे जुने संबंध असूनही मी त्यांची मनधरणी काही ऐकली नाही.
कारण माझ्या दृष्टीनं वैयक्तिक नातं आणि ‘प्रोफेशनल’ काम यात गडबड करता कामा नये. म्हणूनच मी लाड यांनाही सौजन्यानं नकार दिला. ते ऐकून तोरणे आणखीनच भडकले, तेव्हाच्या एका आघाडीच्या नायकाचं नाव घेऊन माझ्या जागी आता त्याला आणेन, अशी धमकीसुद्धा त्यांनी मला दिली. गंमत म्हणजे तोरणेची ही धमकी मला जास्तच लागली; कारण त्यांनी ज्या अभिनेत्याबरोबर माझी तुलना केली होती, त्याचं अभिनयातलं साधारण काम मला चांगलंच ठाऊक होतं.(Mahesh Kothare Rejected The Film)
त्यामुळे माझा नकार तर आता अगदी पक्का झाला होता. तोरणे हे त्या काळातलं मोठं नाव होतं. त्यांच्याबद्दल मला आदरही होता. त्यामुळे ते माझा सर्वांसमोर पाणउतारा करीत असताना आपण एका शब्दानंही त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही असं मी ठरवलं होतं. या सीनचा शेवटही मीच केला. “थँक्यू सो मच! बाय!!” एवढे चार शब्द बोलून मी तिथून बाहेर पडलो. आणि मागे वळूनदेखील पाहिलं नाही. तोरणेंना ठामपणे नकार देण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे मी तेव्हा करीत असलेले आणखी दोन महत्त्वाचे चित्रपट ‘घरचा भेदी’ आणि ‘लेक चालली सासरला.’ विशेष बाब म्हणजे या दोन्ही चित्रपटांमध्ये मी खलनायकी व्यक्तिरेखा साकारली होती. यापैकी ‘घरचा भेदी’ हा मला आधी ‘ऑफर’ झाला होता. या चित्रपटात माझी खलनायकी भूमिका असली तरी ती मध्यवर्ती होती.
एका दिग्गज दिग्दर्शकाला नकार देऊन पुढे इंडस्ट्रीत पाऊल टाकून यशस्वी होण्याचं धाडस हे महेश कोठारे यांच्या होत त्यामुळे आज उत्तम कलावंत म्हणून ते संपूर्ण जगात ज्ञात आहे.
