महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. हास्यजत्रानं प्रेक्षकांच्याही मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. या शो मधील सर्वच पात्र हे चाहत्यांना आपलीशी वाटतात.या सर्व स्किट्स सादरीकरण करण्यामध्ये अनेकांची मेहनत आणि कष्ट असतात.लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ असे अनेक लोक मेहनत घेत असतात. यातलीच दोन नावं म्हणजे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी. अनेकदा रंगमंचावर कलाकार या दोन दिग्गजांची नावं घेत असतात. यातीलच सचिन गोस्वामी यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात,तसेच अनेक हास्यजत्रेचे bts व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असून ते हास्यजत्रेसोबतच कुटुंबासोबतचे काही खास क्षण शेअर करत असतात,आजही त्यांनी सेटवरील काही बीट्स व्हिडीओ शेअर केला.(sachin goswami)
हास्यजत्रेचे कलाकार प्रेक्षकांना हसविण्यासाठी वेगवेगळे विषय स्किटसाठी हाताळतात. तर आता देखील ते कुस्तीचं स्किट घेऊन श्याम राजपूत,दत्तू मोरे आणि काही कलाकार लवकरच येणार आहेत.रिहर्सल हास्यजत्रा असं म्हणत सचिन गोस्वामी यांनी व्हिडीओ शेअर केलाय.तर या व्हिडिओत सचिन गोस्वामी श्याम राजपूत आणि दत्तू मोरे यांना कुस्तीच्या आखाड्यात कुस्ती शिकवताना दिसतात.हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय.हा व्हिडीओ पाहून खूप छान सर यू आर अमेझिंग,सरांच्या हाताखाली जे जे शिकणार तेच या चंदेरी दुनियेत टिकणार अश्या अनेक कमेंट चाहत्यांनी केल्यात. या सोबतच सचिन गोस्वामी नेहमी अनेक bts व्हिडीओ शेअर करतात. त्यांचे सर्व bts व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.(sachin goswami)
हे देखील वाचा: अरुंधती, संजना आणि आता अनिरुद्धच्या आयुष्यात नव्या स्त्रीची होणार एन्ट्री?आई कुठे काय करते मालिकेत येणार नवीन वळण!
सचिन गोस्वामी यांना सर्वगुण संपन्न दिग्दर्शक आणि पांढऱ्या केसांचा राजकुमार म्हटलं जातं.सचिन गोस्वामी हे हास्यजत्रेच्या सेटवर गायन, वाद्य वादन अश्या अनेक कला सेटवर सादर करत असतात.यासोबत ते कलाकारांना देखील स्किट सादरीकरण शिकवतात आणि कलाकार देखील नेहमीच त्यांच्या आदर करताना दिसतात.
