महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत. या कार्यक्रमाने आजवर साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो घेऊन हे कलाकार परदेश दौरा करण्यात व्यस्त आहेत. घरापासून दूर परदेशात जाऊन ही कलाकार मंडळी सध्या तेथील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहेत. तिथे जाऊन ही कलाकार मंडळींची तारवेरची कसरत सुरूच आहे. एका पाठोपाठ शो करत त्यांचा तिथला प्रवास सुरूच आहे. परदेश दौऱ्या दरम्यान हास्यजत्रेतील कलाकारांना आलेला एक अनुभव अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. चला तर पाहुयात काय म्हणाली प्रियदर्शिनी. (Maharashtrachi Hasyajatra)
प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट करत, ‘आमची flight cancel झाली. ४ वाजता न्यू जर्सी ला शो होता आणि आम्ही २ वाजेपर्यंत अजून बॉस्टन ला च होतो. हे समजल्यावर लगेच बॉस्टन च्या महाराष्ट्र मंडळाचे लोक airport वर पोचले. आमच्यासाठी by road जाण्याची व्यवस्था करण्यात आली. NJ च्या लोकांना mail पोहोचली की ४ चा शो ७ वाजता सुरु होईल कारण असं असं झालय. रस्त्यात जेवणासाठी १६ min थाबुंन आम्ही full स्पीड ने ५ तासांच्या drive साठी निघालो. नेमका traffic ने आम्हाला त्रास दिला. गेल्या गेल्या शो सुरु करता यावा म्हणुन आम्ही गाडीतच मेक अप केला. केस आवरले. प्रेक्षकाना zoom call करुन विनंती केली की अजून काही काळ please कळ सोसा, आम्ही पोहोचतच आहोत.
पाहा का उडालीय हास्यजत्रेतील कलाकारांची तारांबळ (Maharashtrachi Hasyajatra)
त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळाली. जवळपास ९०० लोक, sold out show, २ तास आमची वाट पाहत होते आणि टाळ्यांच्या गजरात आमचं स्वागत झालं. खूप लांबून लोक आले होते आणि सगळे थांबले होते. हास्यजत्रेवरचं हे प्रेम पाहुन आम्ही सगळे भारावुन गेलो होतो. मी नशिबवान आहे की या teamचा भाग आहे. USA Tour मधल्या NJ च्या शो साठी केलेली धावपळ आणि त्यावरचा प्रतिसाद हा कायम आठवणीत राहील.’ असं म्हणत तिने अनुभव शेअर केला आहे.
यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी कमेंट करत म्हटलंय की, हे लेखक,तंत्रज्ञ, कलावंत आणि सोनी मराठी ची सगळी टीम यांचे एकत्रीत परिश्रमाचे फळ आहे…proud of you team MHJ .
