दोन दिवसापासून सोशल मीडियावर हवा आहे ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता, तेव्हापासून हास्यजत्रेचे कलाकार हास्यजत्रेकडे डोळे लावून बसले होते. आता मात्र प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम मिळणार आहे, कारण पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सुरु होणार असल्याचं समोर आलं आहे. सोनी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक प्रोमो आउट करण्यात आला असून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पुन्हा सुरु होणार असल्याचं समोर आलं आहे. (Onkar Bhojane MHJ)
सोनी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर हा नवा प्रोमो समोर आला. ज्यामध्ये हास्य जत्रेतील कलाकार इशा डे, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, दत्तू मोरे, वनिता खरात व समीर चौघुले दिसत आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोनुसार यंदाचे पर्व “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – सहकुटुंब हसू या!” असं असणार आहे. प्रोमो आल्यापासून एक नवीन चर्चेला उधाण आल्याचं समोर आलं आहे.
पाहा ओंकारसाठी चाहत्यांची खास मागणी (Onkar Bhojane MHJ)
सोनी मराठीकडून शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या चाहत्यांनी अभिनेता ओंकार भोजनेला परत घेण्याची मागणी सुरु केली आहे. आजवर ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र काही कारणास्तव त्याने हास्यजत्रेतून काढता पाय घेतला. ओंकारच्या हास्यजत्रेतल्या एक्झिट मुळे ओंकारचे चाहते नाराज झाल्याचं समोर आलं. मात्र आता पुन्हा एकदा हास्यजत्रा सुरु होतेय हे समजताच चाहत्यांनी हास्यजत्रेत ओंकारला घेण्याचं मागणी केली आहे.
हे देखील वाचा – “समाजात नियोजनबद्धरीतीने…” हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची फेसबुक पोस्ट चर्चेत
एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “we want onkar bhojane back “, तर हैदराबाद येथील एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “Plz include Onkar Bhojane, without him show is incomplete…. I am from Hyderabad n here in Hyderabad our marathi group fan of MHJ ” तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “ओमकार भोजने ला परत नक्की घ्या तरच मज्जा येईल”.

आता चाहत्यांच्या, प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ओंकार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत दिसणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.