Ankita Walavalkar On Influencer : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. अंकिताने आजवर तिच्या मालवणी भाषेतील कन्टेन्टने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अंकिता नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली आहे. बरेचदा अंकिताला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती वेळोवेळी स्पष्टपणे बोलताना दिसली आहे. अशातच अंकिताने इन्फ्लुएन्सर्सबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. अंकिताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इन्फ्लुएन्सर्स आणि त्यांना मिळणार काम याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी तिने ‘बिग बॉस’ फेम सूरज चव्हाणच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झापूक झुपुक’ चित्रपटाबाबतही भाष्य केलं आहे.
अंकिताने नुकतीच अमृता राव यांच्या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अंकिता म्हणाली, “मला अनेक चित्रपटांसाठी विचारणा झाली होती पण, लीड रोलसाठी कधीही ऑफर आलेली नाही. सध्या इन्फ्लुएन्सर हा शब्द आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो. या इन्फ्लुएन्सर शब्दाचा अर्थ अजूनही अनेकांना समजलेला नाही. कारण, प्रत्येकजण स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणतोय पण, कोणीच स्वतःला क्रिएटर म्हणत नाही आहे. तुमच्यामुळे खरंच लोक इन्फ्लुएन्स होत आहेत का? इन्फ्लुएन्स होण्यासारखं खरंच तुम्ही लोकांना काही देताय का? हे अनेकांना आजही क्लिअर नाही”.
आणखी वाचा – मालिकांमधील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, बेबी बंप दाखवत शेअर केले फोटो, सुंदर लूकने वेधलं लक्ष
अंकिता पुढे असंही म्हणाली, “दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इंडस्ट्री असो किंवा सोशल मीडियावर सगळीकडे इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्सचा आकडा पाहिला जातो. अरे… हिच्याकडे खूप फॉलोअर्स आहेत आपण हिला घेऊयात अशी मानसिकता लोकांची झालेली आहे”. सूरजचे फॅन्स मोठ्या प्रमाणात असूनही चित्रपट का चालला नाही? यावर अंकिता म्हणाली, “सूरजचे जे फॅन्स आहेत ते सगळ्यात जास्त गावाकडचे आहेत. त्यामुळे त्या सगळ्या लोकांना थिएटरपर्यंत आणणं ही खूप कठीण गोष्ट आहे. सूरज फेमस झाला तेव्हा वातावरण तसं होतं. सूरजचा स्वभाव, त्याचा साधेभोळेपणा सर्वांना आवडला म्हणून तो सर्वत्र चर्चेत आला. पण, आता एक सूरज झाला म्हणून, तसे १० सूरज होऊ शकणार नाहीत हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे”.
आणखी वाचा – उत्तरप्रदेशमधील पालकांचा अभिमानास्पद निर्णय, १७ नवजात मुलींची नावं ठेवली ‘सिंदूर’ कारण…
अलीकडच्या काळातील इन्फ्लुएन्सर्सबद्दल बोलताना अंकिता म्हणाली, “अनेक लोक बायोमध्ये लिहितात हॅशटॅग गरीबाचं पोरगं, हॅशटॅग गरीबाचं लेकरू… हे करण्यापेक्षा आपण एखाद्या गोष्टीवर मात करुन पुढे गेलं पाहिजे. सूरज गरीब होता म्हणून फेमस झाला असा विचार जे लोक करतात तो विचार अत्यंत चुकीचा आहे. आजकालचे लोक असाच चुकीचा समज करुन इन्फ्लुएन्स होत आहेत”.