samudrik shastra : समाजात वावरत असताना आपण एकमेकांना ओळखणं फार गरजेचं असतं. एखाद्या व्यक्तीची मित्र किंवा मैत्रीण म्हणून निवड करताना तो व्यक्ती नक्की कसा आहे? हेही समजून घेणं महत्त्वाचं असतं. काही जणं तर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे पाहूनच त्यांना ओळखतात. शास्त्रांचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तींकडे अशाप्रकारची कला अवगत असते. डोळ्यांना हृदयाचा आरसादेखील म्हणतात. तुमच्या मनात नक्की काय चाललं आहे हे तुमच्या डोळ्यांत कुठेतरी दिसतं. सामुद्रिक शास्त्रानुसार डोळ्यांमध्ये अनेक प्रकारची रहस्ये दडलेली असतात. तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्याबद्दल काय सांगतो ते जाणून घेऊया.
डोळ्यांच्या रंगांवरुन खरंच व्यक्ती ओळखता येते का?
समुद्र शास्त्रानुसार निळसर डोळे असलेल्या लोकांना जीवनात स्थिरता हवी असते. असे लोक इतरांना मदत करण्यात सक्रिय असतात. शांतता आणि इतर लोकांना मदत करण्यास प्राधान्य देतात. इतरांना मदत करण्याच्या प्रक्रियेत, कधीकधी हे लोक स्वतःचे नुकसानही करतात. ज्यांचे डोळे धूसर असतात त्यांना आयुष्य जोमाने जगणे आवडते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन आवडत नाही. त्यांना नवीन गोष्टी करून बघायला आवडतात. तसेच अशा लोकांना नवीन लोकांना भेटणे आवडते.
आणखी वाचा – नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या सुनीता विल्यम्स, सेलिब्रिटींचा आनंदही गगनात मावेना, आर.माधवन म्हणाले…
कांजी किंवा हलके पिवळे डोळे असलेले लोक सहसा मजा आणि साहस करतात. हे लोक परिस्थितीशी जुळवून घेण्यात आणि काळाबरोबर पुढे जाण्यात पटाईत असतात. साहसी आणि काही काळानंतर त्यांना जीवनाचा कंटाळा येऊ लागतो. तपकिरी डोळे असलेल्या लोकांना स्वतःच्या अटींवर जीवन जगणे आवडते आणि जीवनात सर्जनशीलतेला महत्त्व देतात. मोहक, उदार, मैत्रीपूर्ण आणि नवीन गोष्टी वापरून पाहायच्या असतात. तपकिरी डोळे असलेले लोक त्यांच्या जीवनात प्रेमाला अधिक महत्त्व देतात. त्यांच्या जोडीदाराप्रती प्रामाणिक राहतात.
आणखी वाचा – नागपूर हिंसाचाराचा संबंध विकी कौशलच्या ‘छावा’शी जोडल्याने प्रेक्षक भडकले, म्हणाले, “आमचा हिरो…”
शास्त्रानुसार ज्या लोकांचे डोळे काळे असतात त्यांचा आत्मविश्वास खूप जास्त असतो. अशा लोकांना प्रत्येक आव्हानाला एकट्याने सामोरे जाणे आवडते. काळे डोळे असलेले आत्मविश्वासी लोक आपली जबाबदारी चोख पार पाडतात. हे लोक विचारपूर्वक निर्णय घेतात आणि आपल्या जोडीदाराशी खूप निष्ठावान असतात. हिरवंसर डोळे असलेले लोक खूप सक्रिय दिसतात पण आतून ते खूप आळशी असतात. हे लोक उद्यापर्यंत प्रत्येक काम पुढे ढकलण्याची शक्यता असते. अशा लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यात खूप त्रास होतो. तसेच त्यांचे बोलणे, नातेसंबंध आणि गोष्टी गुप्त ठेवायला आवडतात.