लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या ८ महिन्यांनंतरच दलजीत कौर पतीपासून विभक्त झाली आहे. २०२३ मध्ये दलजीत कौरने केनियातील उद्योगपती निखिल पटेलबरोबर लग्न केले. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या.
दलजीत कौरने पती निखिल पटेलवर फसवणूक व विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र निखिल पटेलने दलजीत कौरचे हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. आता दलजीत कौरने निखिलवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून या लढ्यात तिची मैत्रीण आणि अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. तसेच तिने आपल्या मैत्रीणीचा विश्वासघात केल्याबद्दल निखिलवर संताप व्यक्त केला.

करिश्मा तन्नाने तिच्या इंस्टाग्रामवर दलजीत कौरने केलेल्या फसवणुकीचे आरोपाबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यावर असं लिहिलं आहे की, “जे घडले ते व्हायला नको होते. निखिल पटेल या माणसाने माझ्या जिवलग मैत्रिणीवर अन्याय केला आहे. त्यामुळे माझा पूर्ण पाठिंबा दलजीत कौरला आहे. मी शेवटपर्यंत तिच्या पाठीशी असेन. सशक्त स्त्रिया बदला घेत नाहीत, त्या पुढे जातात आणि कर्माला काम करू देतात”.
आणखी वाचा – अखेर बाप-लेकाची भेट झाली, अमोलला भेटताच अर्जुन भावुक, कडकडून मिठी मारताच रडू लागला अन्…
निखिलने काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नाबाबत इतकेच सांगितले होते की, त्याचे व दलजीतचे लग्न हिंदू रितीरिवाजानुसार झाले होते आणि ते कायदेशीररित्या नोंदणीकृत नव्हते. काही काळापूर्वी निखिल पटेलने दलजीतला नोटीस पाठवून तिचे सर्व सामान केनियाहून नेण्यास सांगितले होते. ‘दलजीतने आपले सर्व सामान घ्यावे अन्यथा तो दान करेल’ असेही त्याने सांगितले होते.
दरम्यान, आता दलजीतने त्याच्याविरुद्ध केनियाच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. दलजीत कौर केनियाहून परतली असून निखिल तिचे सामान बाहेर काढू शकत नाही. तिने केनियाच्या कोर्टाकडून त्यावर स्थगिती घेतली आहे.