Kareena Kapoor On Food : कलाकारांच्या राहणीमानाबाबत, त्यांच्या जीवनशैलीबाबत जाणून घेणे प्रेक्षकांना कधीही आवडतं. ही कलाकार मंडळी काय खातात, त्यांचा डाएट प्लॅन नेहमी काय असतो, त्यांच्या घरी कोण असतं, कोण जेवण बनवतं, कोण काम करत अशा अनेक गोष्टी जाणून घेणे चाहतेमंडळींना आवश्यक वाटतं. कलाकार म्हणून वावरत असताना ही मंडळी त्याच्या विशेषतः खानपानाकडे लक्ष देतात. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरही एक अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी त्यांच्या खाण्यापिण्याची आणि पेयांची काळजी घेते. करीना देशी आणि होममेड फूडकडे विशेष लक्ष देते. तिचे म्हणणे आहे की ती आणि तिचा नवरा सैफ अली खान यांना घरी स्वयंपाक करण्याची सवय झाली आहे. ती असंही म्हणाली की, सैफ तिच्यापेक्षा चांगला स्वयंपाक करतो.
जेवणाच्या आवडीबाबत करीनाचे भाष्य
करीनाने अलीकडेच तिच्या ‘न्यूट्रिशनिस्ट’ रुजुता दिवेकर यांच्या ‘द कॉमननेस डाएट’ या पुस्तकाच्या प्रक्षेपणवेळी तिच्या घराचा हा किस्सा शेअर केला. ती म्हणाली, “दिवसाच्या कठोर परिश्रमानंतर, घरगुती खाण्यापेक्षा चांगले काहीही नाही. म्हणजे, आता सैफ आणि मी स्वत: अन्न शिजवण्यास सुरवात केली आहे”. ती म्हणाली, “आम्ही त्याचा आनंद घेतो (घरगुती खाद्यपदार्थाचा), म्हणून आम्ही तशीच आमची जीवनशैली बनविली आहे. सैफ माझ्याहून अधिक चांगले जेवण बनवतो हे स्पष्ट आहे. मला साधी अंडीही उकडता येत नाहीत”. करीना म्हणाली की, “ती तिच्या जेवणाबाबत फारच निवडक नाही आणि कित्येक दिवस खिचडी खाण्यातही तिला काहीच अडचण नाही”.
करीना कपूरच्या कुटुंबाची आवडती डिश
ती म्हणाली, “जर मी तीन दिवस खिचडी खाऊ शकले नाही तर ती खाण्याची मला इच्छा होते. माझा कुक थकून जातो कारण तो (जसे मला खायचे आहे) मला हवे ते अन्न १०-१५ दिवस बनवतो. आठवड्यातून पाच दिवस खिचडी खायला मला बरे वाटते. त्यात थोडेसे तूप टाकून तर अति उत्तम”. यावेळी तिने असेही सांगितले की कपूर कुटुंबाला एका डिशची खूप आवड आहे. यावेळी करीनाने ‘पाया सूप’ चे नाव घेतले आणि त्यास कुटुंबातील ‘गोल्डन डिश’ म्हटले आहे.