शाहरुख खान अभिनित आगामी ‘जवान’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढून राहिली आहे.चित्रपटाच्या फर्स्ट लुकसोबत चित्रपटातील गाणंही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. नुकतंच चित्रपटातील पहिले गाणे ‘जिंदा बंदा’ प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमधील ऍक्शन आणि शाहरुख खानच्या केसविरहित लूकने चाहत्यांची उत्सुकता ताणून धरली आहे. (Jawan New Song)
दरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील पहिल्या गाण्यातील शाहरुखची ऊर्जा मंत्रमुग्ध करून सोडणारी आहे. ‘जिंदा बंदा’ हे गाणं अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केलं आहे. हे गाणे शोबी याने कोरिओग्राफ केले आहे. तर ‘जिंदा बंदा’ या गाण्याचे बोल इर्शाद कामिल यांनी शब्दबद्ध केले आहेत.
पाहा जवान मधील गाण्यातील शाहरुखची ऊर्जा (Jawan New Song)
संगीतकार अनिरुद्ध यांच्या वाजत हे गाणं स्वरबद्ध झाले आहे. शाहरुख खान याने या गाण्याची लिंक ट्विटरवर शेअर करत गाण्याचे बोलही शेअर केले आहेत. या गाण्याबद्दल अनिरुद्ध याने म्हटलं आहे की, “या गाण्यासाठी माझ्या हृदयात एक खास स्थान आहे कारण मी या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेला हा पहिलाच ट्रॅक आहे. शाहरुख खानसाठी ही माझी पहिली रचना आहे. या चित्रपटासाठी तीन भाषांमध्ये अल्बम बनवणे हे आव्हानात्मक काम होतं. मला आशा आहे की ‘जवान’च्या संगीताचा मला जितका आनंद मिळाला तितकाच लोकांना आवडेल.” ‘जिंदा बंदा’ गाण्याचे शूटिंग करायला पाच दिवस लागले होते. गाण्याच्या भव्य सेटवर शाहरुख खानच्या उर्जेसह १००० हून अधिक महिला या गाण्याच्या भाग बनल्या.”

हे गाणे हिंदी (जिंदा बंदा), तामिळ (वंदा आदम) आणि तेलुगू (धुम्मे धुलीपेला) मध्ये रिलीज करण्यात आले आहे. ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’च्या बॅनरखाली निर्मित ‘जवान’चे दिग्दर्शन एटली यांनी केले आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.