Javed Akhtar On Indian Actors : बॉलिवूडचे गीतकार आणि लेखक जावेद अख्तर हे नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. अशातच आता जावेद अख्तर यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. चित्रपटसृष्टीतील बहुतेक लोक सरकारविरुद्ध बोलणे का टाळतात?, हा प्रश्न उपस्थित केला आहे. आणि म्हणाले की, सर्व कलाकार लोकांना शांत राहायला आवडते. जावेद अख्तर यांनी एका विषयावर भाष्य केलं आहे. जावेद अख्तर, जे नेहमीच खुल्या विचारांसाठी ओळखले जातात. जावेद अख्तर नेहमीच चित्रपट सृष्टीवरील कलाकारांबाबत आणि कधीकधी सरकारविरुद्ध बोलताना ते कधीच घाबरत नाहीत. बॉलिवूड सिनेविश्वातील कलाकारांच्या कडू सत्याबाबत ते स्पष्टपणे बोलले आहेत. अलीकडेच, त्याला एका मुलाखतीत विचारले गेले की, बॉलिवूडचे कलाकार सरकारविरुद्ध का बोलत नाहीत?.
जावेद अख्तर कपिल सिबलच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना दिसले. जिथे त्यांनी चित्रपटसृष्टीबद्दल बरंच भाष्य केलं. त्याला विचारले गेले की आजचे कलाकार आपल्या सरकारविरोधात आवाज उठवत नाही, जसे की मेरिल स्ट्रीपने अमेरिकेत त्याच्या सरकारविरुद्ध आवाज उठवला होता तसे, आपले बॉलिवूडचे कलाकार अशावेळी शांत का राहतात?. या प्रश्नाचे उत्तर देत जावेद अख्तर म्हणाले, “तुम्हाला खरोखर हे जाणून घ्यायचे आहे का? पण असे का होते याचा तुम्हाला अंदाजही नसावा. ते म्हणाले, “हे काहीच नाही, काय आहे त्यांचे नाव खूप आहे, परंतु त्यांची आर्थिक स्थिती इतकी चांगली नाही. संपूर्ण चित्रपटसृष्टीला एक मध्यमवर्गीय व्यावसायिक खिशात ठेवू शकतो. जे श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे त्यांच्यापैकी कोण आवाज उठवत?, कोण बोलतं?”.
यावर मुलाखतदाराने पुन्हा प्रश्न विचारत म्हटले की, “त्यांच्याकडे ईडीचे छापे पडतील, असा तुमचा दृष्टीकोण आहे का?”. यावर जावेद अख्तर म्हणाले की, “असंच काहीसं मी याकडे पाहतो. मेरिल स्ट्रीपने (अमेरिकन सरकारविरुद्ध) एक विधान केले होते. पण त्यामुळे तिच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला नाही. आता ही केलेल्या विधानामुळे आयकर विभागाचे छापे पडतील ही असुरक्षितता भारतात खरंच आहे की नाही, या वादात मला पडायचं नाही”.
आणखी वाचा – Video : बायकोला मंगळसूत्र घालताना भर मंडपात रडला अक्षय केळकर, अश्रूच थांबेनात अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
पुढे जावेद अख्तर म्हणाले की, “जर हा दृष्टीकोण असेल की केलेल्या विधानामुळे की ईडी. सीबीआय, इनकम टॅक्सचा छापा पडू शकतो, चौकशी होऊ शकते, तर एखाद्याला भीती वाटू शकते. या सगळ्या समस्या आहेत या समस्या चित्रपटसृष्टीच्या नाहीत. चित्रपटसृष्टीच्या बाहेरच्या समस्या आहेत. आता चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसुद्धा इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसारखेच आहेत इतर सामान्य लोकांप्रमाणेच ते काम करतात. या क्षेत्रात फक्त जास्त गाजावाजा असतो”.