Virat Kohli Fitness : प्रत्येकाच्या जीवनात फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे. सध्याची तरुणपिढीच नव्हे तर वयोवृद्धही स्वतःला फिट ठेवण्यासाठी धडपड करत असतात. विशेषतः सेलिब्रिटी मंडळी स्वतःच्या शरीराकडे, आहाराकडे लक्ष देतात. कारण त्यांना स्वतःला छान असं प्रेझेंट करायचं असतं. तर आपले खेळाडूही स्वतःच्या शरीराकडे, आहाराकडे, डाएटकडे खास लक्ष देतात कारण त्यांना खेळताना फिट असणे आवश्यक असते. पण एक सुप्रसिद्ध क्रिकेटर ज्याने त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत स्वतःच्या शरीराकडे विशेष लक्ष दिले नाही आणि त्यामुळे सामन्यात धावा करणेही त्याला जड जाऊ लागले. आपण मागे पडतोय ही गोष्ट लक्षात येताच विराटने व्यायाम करण्याचं ठरवलं, आणि तेव्हापासून तो स्वतःला नेहमीच फिट ठेवतो. हा क्रिकेटर म्हणजे विराट कोहली.
२०१८ साली अपारशक्ती खुराना, आमिर खान यांच्याशी संवाद साधत असताना क्रिकेटपटू विराट कोहलीने कबूल केले की, २०१२ पर्यंत तिची शरीररचना खूप निराळी होती. “२०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आम्ही परत आलो आणि आशिया कपसाठी बांग्लादेशला गेलो तेव्हा पाकिस्तानबरोबरच्या एका सामन्यात मी एकदिवसीय कसोटी सामन्यात १८३ धावा काढल्या होत्या. तो काळ चांगला होता. म्हणून मला वाटले की, जर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, तर मला आयपीएलमध्येसुद्धा चांगली कामगिरी करत वर्चस्व गाजवायला मिळेल, पण हा एक खेळ आहे. येथे तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. मला अनेकदा अपयश आले. पहिल्या सहा-सात सामन्यांमध्ये मी धावा करु शकलो नाही. मी क्वचितच दोन आकडे रन काढू शकलो आणि यामुळे मानसिकदृष्ट्या मी पूर्णपणे खचलो”.
आणखी वाचा – पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष
पुढे विराट म्हणाला, “मी त्यावेळी माझ्या आहार आणि ट्रेनिंगविषयी इतका सीरियस नव्हतो, मला ट्रेनिंग कशी घ्यायची हेसुद्धा कळत नव्हते. मला वाटले की, मी केलेली ही प्रॅक्टिस पुरेशी आहे. त्याशिवाय मला जिममध्ये काय करायचे, किती धावायचे, शरीराचे वजन, फॅट्स किती टक्के काहीही माहिती नव्हते. मी खूप गोड खायचो. हॉटेल रुममध्ये मिनी बारमध्ये असलेले ४० टॉफीची दोन पाकिटे एका आठवड्यात संपवायचो. मला खाण्यापिण्याची पद्धत माहीत नव्हती”.
आणखी वाचा – तीन वर्षांची असताना अॅसिड हल्ला, दृष्टी गेली अन् ‘ति’ने १२वीमध्ये मिळवले ९५ टक्के
विराटच्या आयुष्याला कलाटणी मिळाली
पुढे विराट म्हणाला, “मी अंघोळ करुन बाहेर आलो आणि आरशात स्वतःला पाहिले, तेव्हा मलाच माझी लाज वाटली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटर असताना एखादी व्यक्ती अशी कशी दिसू शकते? तो दिवस माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. दुसऱ्या दिवसापासून मी सर्व काही पूर्णपणे थांबवले आणि माझा पूर्ण डाएट प्लॅन बदलला. आणि त्यांनतर मी दररोज दोन तास जिममध्ये वर्कआउट करु लागलो”.