सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 12, 2025 | 4:23 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Martyr Surendra Moga Daughter

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, "बदला घेईन"

Martyr Surendra Moga Daughter : भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीचा अनेकांना फटका बसला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम आखत पाकिस्तानला चांगलीच अद्दल शिकवली. मात्र या लढाईत अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. तर रात्रंदिवस डोळ्यात तेल टाकून सीमेवर लढा देणाऱ्या अनेक सैनिकांनाही वीरमरण आले. देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीर जवानांच्या कथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. यापैकी एअर फोर्सचे सुरेंद्र मोगा झुंझुनु येथील मंदाव गावचे सुपूत्र हे एक अमर शहीदांपैकी एक नाव बनले आहे. जम्मू -काश्मीरच्या आरएस पुरा क्षेत्रात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शनिवारी (१० मे) रोजी त्यांना वीरता प्राप्त झाली. पण त्यांची ११ वर्षाची मुलगी वार्तिका हिने वडिलांच्या निधनानंतर जे काय म्हटलं ते ऐकून संपूर्ण देशाला तिचा अभिमान वाटला.

“मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे, मी माझ्या वडिलांचा बदला घेईन”, हे शब्द जेव्हा या जवानाची लेक वार्तिकाच्या तोंडून निघाले तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, परंतु तिची बापासाठीची तळमळ तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. ही एक सामान्य मुलगी नाही, ती शहीदाची मुलगी आहे, ज्याने तिच्या वडिलांच्या शहिदतेला एक मिशन बनविले आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास सुरेंद्र मोगा यांनी आपली पत्नी सीमा आणि मुलीला अखेरचा फोन कॉल केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी ड्रोन फिरत आहेत परंतु आतापर्यंत कोणताही हल्ला झाला नाही आणि ते सुरक्षित आहेत. पण हे त्यांचे शेवटचे संभाषण असेल हे कोणाला माहित नव्हते.

आणखी वाचा – बॉलिवूड कलाकार सरकारविरोधात का बोलत नाहीत?, जावेद अख्तर म्हणाले, “ईडी, सीबीआय पाठी लागली तर…”

#WATCH | Jhunjhunu, Rajasthan | Vartika, Daughter of Sergeant Surendra Moga, says, "I am feeling proud that my father got martyred while killing the enemies and protecting the nation… Last time, we talked to him at 9 PM last night and he said that drones are roaming but not… https://t.co/H0EI1xKw4e pic.twitter.com/0mIHuHT8iL

— ANI (@ANI) May 11, 2025

दुसर्‍या दिवशी सकाळी, जेव्हा सुरेंद्र मोगा आपल्यात नाहीत ही बातमी कानावर पडली तेव्हा कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. पत्नीने तर अंगच टाकले. मात्र या सगळ्यात ११ वर्षाची चिमुरडी खंबीरपणे उभी होती. वडिलांनी देशसेवेसाठी प्राण गमावले ही बाब लक्षात घेता आता आपण कुठेच थांबून चालायचं नाही आपण वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आणि देशसेवा करायची हा विचार करत अश्रू रोखून धरले आणि म्हटलं, “पाकिस्तान संपला पाहिजे, पाकिस्तान हे नावही पुन्हा घेतले जाता कामा नये”.

आणखी वाचा – मराठीत ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची चर्चा, स्त्रियांचा संघर्ष अधोरेखित करणारं कैलास खैर यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

“मला माझ्या वडिलांसारखे सैनिक व्हायचे आहे आणि मी माझ्या वडिलांचा बदला घेईन”, हे वाक्य केवळ ११ वर्षीय जवानाची लेक घेतेय ही कौतुकास्पद बाब म्हणावी. या जवानाच्या लेकीने घेतलेल्या या निर्णयाने अनेकांचे डोळे पाणावले. वार्तिकाच्या या निर्णयाचं केवळ झुंझुनूलाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. वडिलांचे अपूर्ण राहिलेलं मिशन पूर्ण करण्याचं एकमेव स्वप्न आता वार्तिका जगणार आहे. समस्त जनतेने वार्तिकाच्या या निर्णयाचं भरभरुन कौतुक केलं आहे.

Tags: india pakistan warindian air forceOperation Sindoor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiny Doshi Shocking Revelation
Entertainment

“तू धंदा करायला जातेस का?”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीला वडीलांकडूनच घाणेरडी वागणूक, आईलाही लाथा-बुक्क्यांनी मारायचे तेव्हा…

मे 12, 2025 | 7:00 pm
handicap couple love story
Social

Video : अपघातात गमावले दोन्ही हात, तरीही गर्लफ्रेंडने केलं लग्न; सात वर्षांच्या प्रेमाला घरातून विरोध असताना…

मे 12, 2025 | 6:33 pm
Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Next Post
Anushka sharma on virat kohli retirement

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता...”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.