बुधवार, मे 14, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दादांना राधानगरीच्या जंगलात सुचलं ‘वर ढगाला लागली कळं…’ वाचा नक्की काय आहे किस्सा

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मे 10, 2023 | 1:46 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Dada Kondke Songs Songadya

Dada Kondke Songs Songadya

वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळ ही लाईन प्रत्येकानेच ऐकली असेल. अभिनयाचं चालत बोलतं विध्यापीठ अशी ख्याती असलेले आणि या गाण्याचे निर्माते, लेखक म्हणजेच दादा कोंडके. अनेक विनोदी चित्रपट, लोकनाट्य रचत दादांनी मनोरंजन सृष्टी बहारदार बनवली. सेन्सॉर बोर्डला देखील डोकं फोडायला लावणारे दादा कोंडके ओळखले जायचे त्यांच्या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाच्या नावासाठी. तर चित्रपटातील गाणी हे दादांच्या चित्रपटांच्या यशाचा एक अमूलाग्र भाग असायची याचं गाण्यांमधलं एक अत्यंत लोकप्रिय गाणं म्हणजे ‘ढगाला लागली कळं’.(Dada Kondke Songs Songadya)

कोणतंही गाणं फेमस होण्यामागे महत्वाचे असतात ते त्याचे शब्द आणि ढगाला लागली कळं या गाण्याचे बोल दादांना सुचले कसे याबद्दल स्वतः दादा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं आहे. सोंगाड्या तुफान गाजला त्यामागे एक कारण होतं हे गाणं आणि हे गाणं दादांना सुचलं होतं राधानगरीच्या जंगलात. दादा त्यांच्या मित्रांसोबत शिकारीला गेले होते. रात्रभर दादांनी आणि त्यांच्या सवंगड्यानी भटकूनही त्यांना शिकार मिळाली नाही त्यामुळे एका झाडाखाली सगळे विसावा घ्यायला थांबले.

पहाटेची वेळ होती आणि त्यात थंडी त्यामुळे दादांनी त्यापासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली. त्याचवेळी दादांना आभाळात एकच काळा ढग दादांना दिसला आणि त्यातून हलकीशी थेंबगळ सुरु झाली आणि दादांना मुखडा सुचला ‘ वर ढगाला लागलीये कळ, पाणी थेंब थेंब गळ’. शिकारीवरून परत आल्यावर दादांनी पूर्ण गाणं लिहून काढलं.
यावरून समजत कि दादा कोंडके हे केवळ विनोदवीर नसून किती उत्तम कवी होते याची प्रचिती येते.(Dada Kondke Songs Songadya)

Tags: dada kondkeentertainmentfamous songits majjamarathi moviesongadyavar dhagala lagli kal
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Delivery Boy Motivational Video
Entertainment

पायाने अपंग तरी डिलिव्हरीसाठी दारोदारी भटकणारा ‘तो’, महिन्याला कमावतो इतके पैसे, चारचाकीतून आई-वडिलांना फिरवण्याचं स्वप्न अन्…

मे 14, 2025 | 7:00 pm
Sharad ponkshe talk about Marathi industry
Entertainment

“इंडस्ट्रीतील लोक खोटे, आजारपणात सगळं कळलं अन्…”, शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “समोर फक्त पाया पडणं…”

मे 14, 2025 | 6:35 pm
Disadvantages Of Wi Fi Router
Lifestyle

रात्रभर घरातील wifi सुरु ठेवताय?, असं केल्यास शरीरास निर्माण होतो धोका, आजारांना आमंत्रण आणि…

मे 14, 2025 | 6:00 pm
. Aamir khan sitaare zameen par boycott Turkey Connection
Entertainment

आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर येताच बॉयकॉटची मागणी, सुपरस्टार पुन्हा सुपरफ्लॉप?, तुर्की कनेक्शन अन्…

मे 14, 2025 | 5:48 pm
Next Post
Kiran Mane And Daughter

मुलीबद्दल बोलताना अंगावर काटा आला- किरण मानेंनी केली लेकीसाठी भावुक पोस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.