मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

क्रूझवर मर्डर, किलर कॉमेडी अन्…; ‘हाऊसफुल ५’चा धमाकेदार टीझर, अक्षय कुमार, रितेश देशमुख, संजय दत्तला पाहून प्रेक्षक म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 30, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Housefull 5 Teaser

‘हाऊसफुल ५’चा धमाकेदार टीझर, अक्षय कुमार, रितेश देशमुख, संजय दत्तला पाहून प्रेक्षक म्हणाले…

Housefull 5 Teaser : बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय फ्रेंचायझी ‘हाऊसफुल’ चित्रपटाचा पाचवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘हाऊसफुल ५’ पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. आता हा मल्टीस्टारर चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा संपणार आहे. ‘हाऊसफुल ५’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये, निर्मात्यांनी संपूर्ण स्टारकास्ट सादर केली आहे. चित्रपटात एकूण १८ कलाकार दिसणार असल्याचं यादरम्यान समोर आलं आहे. निर्मात्यांनी संपूर्ण स्टारकास्ट ‘हाऊसफुल ५च्या टीझरसह सादर केली आहे. ज्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या शैलीत दिसत आहे. हा टीझर विशेषतः चाहते मंडळींना खूप आवडला आहे.

१५ वर्षांपूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग आला होता. ‘हाऊसफुल ५’चा टीझर अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “15 वर्षांपूर्वी … मॅडनेस सुरु झाला. भारताची सर्वात मोठी फ्रँचायझी ५ व्या हप्त्यासह परत आली आहे आणि यावेळी ती केवळ अराजक आणि विनोदी नाही …. परंतु एक किलर एक विनोद आहे. येथे हाऊसफुल ५ चा टीझर आहे. हा चित्रपट जून महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होईल”.

आणखी वाचा – IPL मध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचीच हवा, बॉलिवूड कलाकारांनाही भुरळ, कौतुक करत म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

टीझरमध्ये, सर्व कलाकार प्रथम क्रूझवर दर्शविले गेले आहेत. हे पाहताना असे दिसते की प्रत्येकजण क्रूझवर पार्टीसाठी गेलेले दिसत आहेत. जिथे आधीच एक खून झालेला आहे. खून करणाऱ्या व्यक्तीच्या मुखवट्याची यावेळी झलक दिसली. आता हा किलर कोण आहे हे पाहण्यासाठी, आपल्याला चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. ‘हाऊसफुल ५’ हा एक मोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, जैकी श्रॉफ, डिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लीवर, श्रेयस तलपड़े, निकितिन धीर, रंजीत, आकाशदीप साबिर, जैकलीन फर्नांडिज, नर्गिस फाखरी, चित्रांगदा सिंह आणि सौंदर्या शर्मा ही कलाकार मंडळी धुमाकूळ घालणार आहेत.

आणखी वाचा – “स्टेडियम भरा तेव्हाच येईन”, मेलबर्न शोमध्ये उशिरा येण्यामागे नेहा कक्करचा ड्रामा, रडण्याचंही नाटक, आयोजकांचा मोठा दावा

या व्यतिरिक्त, चित्रपटात आणखी किती अभिनेते आहेत हे देखील लवकरच कळेल. चित्रपटात इतकी मोठी स्टारकास्ट पाहून प्रत्येकाला धक्का बसला. टीझरमध्ये, एकमेव लाल परी गाणे पार्श्वभूमीत वाजत आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
pahalgam terrorist attack survivor stories

झोपच नाही, मेंदू बाहेर आलेला दिसतो, डोळे बंद केले की गोळ्या घालणारा माणूस...; हल्ल्यानंतर पीडित कुटुंबियांची भयानक परिस्थिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.