Home remedies for glowing skin : त्वचा सुंदर, स्वच्छ असावी म्हणून कित्येकजण विविध उपाय करतात. विविध ब्युटी प्रॉडक्सचाही वापर करतात. बऱ्याचदा हाताचे कोपर तसेच गुडघ्यांचा काळेपणा महिलावर्गाला सतावत असतो. ते काळे डाग नकोसे वाटतात. अनेक सौंदर्य उत्पादनांचा अवलंब करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. पण हे काळे डाग नाहीसे करण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून तुम्ही उपयुक्त ब्युटी प्रॉडक्ट तयार करु शकता. त्यासाठी लागणारं साहित्य तसेच बनवण्याची प्रक्रिया नक्की काय? याबाबत आज आपण सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत.
आपण आपल्या चेहऱ्याकडे अधिकाधिक लक्ष देतो. पण हात व पायाचा काही भाग बऱ्याचदा काळवंडलेला दिसतो. कोपर आणि गुडघ्यांच्या त्वचेची इतर भागांशी तुलना करतो तेव्हा ते गडद असतात. ही एक सामान्य समस्या आहे. पण याचा अर्थ असा नाही की, त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. हाताच्या कोपराला फक्त साबण, स्क्रब लावल्याने काळेपणा कमी होत नाही. त्यासाठी योग्य ते घरगुती उपायही फायदेशीर ठरु शकतात.
आणखी वाचा – हिंदू असूनही एआर रेहमान यांनी मुस्लिम धर्म का स्वीकारला?, ‘त्या’ एका कारणामुळे मोठा निर्णय घेतला अन्…
त्वतेवरील काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय
काही उपाय हे असे आहेत की, जे कोपर आणि गुडघ्यांमध्ये जमा झालेल्या मृत त्वचेच्या पेशी साफ करून त्वचेचा काळेपणा कमी करण्यास मदत करतील. त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता तुमचे हात आणि पाय कसे दिसतील याचा विचार न करता तुम्ही मुक्तपणे शॉर्ट आणि स्लीव्हलेस पोशाख कॅरी करू शकता.
मध तुमच्या त्वचेचा गडद रंग उजळण्यास मदत करेल आणि मध त्वचेला पोषण देण्यासही मदत करेल. यासाठी मधामध्ये जिलेटिनही मिक्स करावे. जे त्वचा घट्ट होण्यास मदत करते आणि कोलेजन वाढवण्यास मदत करते. सर्व प्रथम जिलेटिन पावडर एका भांड्यात घ्या आणि दुधात मिसळा. दहा मिनिटे हे मिश्रण असंच ठेवा.
यानंतर भांड्यात मध आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. आता तयार केलेली पेस्ट कोपर आणि गुडघ्यावर लावा आणि सुमारे दहा मिनिटे कोरडे होऊ द्या. जेव्हा ते पूर्णपणे सुकते तेव्हा ते हळूवारपणे काढून टाका आणि त्वचेपासून वेगळे करा. यानंतर कोमट पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा उपाय केल्याने काळेपणा दूर होण्यास मदत होईल. तुमच्यापैकी अनेकांना काळसर कोपर आणि गुडघ्याचा त्रास होत असेल, पण आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे आता तुम्ही या काळेपणाची अजिबात काळजी करू नका यावरही हे घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकता.
टीप – वरील दिलेल्या माहितीची ITSMAJJA पुष्टी करत नाही. तुम्ही तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांचा याबाबत सल्ला घेऊ शकता.