मराठी कलाविश्वातले प्रसिद्ध जेष्ठ कवी कुसुमाग्रज म्हणजेच “विष्णू वामन शिरवाडकर” आज यांच्या जयंती निमित्त “मराठी भाषा दिवस” संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. यानिमित्ताने मराठीतील काही खास चित्रपट ज्यांचे हिंदी चित्रपटात रिमेक बनवण्यात आले आहेत. कोणते आहेत ते चित्रपट चला पाहुयात.(marathi bhasha divas special)
हिंदीत रिमेक झालेले मराठी चित्रपट
“पोस्टर बॉईज” हा श्रेयस तळपदेने दिग्दर्शन केलेला सिनेमा असून, श्रेयस ने दिग्दर्शनात पदार्पण पोस्टर बॉईज या चित्रपटातून केलं होतं. मराठी चित्रपट “पोस्टर बॉईज” या चित्रपटाचा हा रिमेक होता. ज्यात त्याने निर्मिती सुद्धा केली होती. आणि त्यात अभिनय ही केला होता. श्रेयस व्यतिरिक्त सनी देओल आणि बॉबी देओल यांनी सुद्धा या चित्रपट काम केले होते.

“दम लगा के हैशा” हा आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांचा अभिनय असलेला रोमँटिक कॉमेडी सिनेमा होता. मराठी चित्रपट “अगडबम” या चित्रपटासारखे आश्चर्यकारक साम्य यात दिसून येते. शरद कटारिया याने या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे.

“मुंबई दिल्ली मुंबई” हा हिंदी सिनेमा सतीश राजवाडे दिग्दर्शित “मुंबई-पुणे-मुंबई” या मराठी चित्रपटातून रूपांतरित करण्यात आला होता. मुंबई दिल्ली मुंबई शिव पंडित आणि पिया बाजपेमाडे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.परंतु मराठी चित्रपटाप्रमाणे या सिनेमाला प्रेक्षकांनी तितका प्रतिसाद दिला नाही.

“पेइंग गेस्ट” श्रेयस तळपदे, जावेद जाफरी, आशिष चौधरी आणि वत्सल सेठ यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या असून या कॉमेडीचे कथानक असलेल्या चित्रपटाचे मूळ कथानक 1966 च्या बीवी और मकान चित्रपटातून घेतले आहे, ज्याचा मराठीत 1988 मध्ये अशी ही “बनवा बनवी” म्हणून रिमेक झाला होता. आणि मराठी मध्ये प्रदर्शित झालेला बनवाबनवी हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.

“गोलमाल रिटर्न्स” रोहित शेट्टी कॉमेडी हा १९८९ च्या “फेका फेकी” मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. अजय देवगण, करीना कपूर खान आणि अर्शद वारसी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

बॉलीवूडला भूरळ पाडली या मराठी कथांना(marathi bhasha divas special)
“हे बेबी” हा साजिद खानचा मराठी चित्रपट “बाळाचे बाप ब्रह्मचारी” चे रूपांतर आहे जो 1987 च्या अमेरिकन चित्रपट थ्री मेन अँड अ बेबीवर आधारित होता. अक्षय कुमार, फरदीन खान, विद्या बालन आणि रितेश देशमुख यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

“भागम भाग” हा एक मिस्ट्री कॉमेडी सिनेमा असून या चित्रपटाचे काही कथानक हे मराठी चित्रपट “बिनधास्त” मधून घेतले होते. अक्षय कुमार आणि गोविंदा यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

“टारझन: द वंडर” कार हा एका जादुई गाडीवर आधारित होता, या चित्रपटाची पटकथा मराठीत सिनेमा “एक गाडी बाकी अनाडी” या चित्रपटातून घेण्यात आली होती. अजय देवगण आणि वत्सल सेठ यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

“क्यो की…मैं झुठ नहीं बोलता” हा डेव्हिड धवन दिग्दर्शित कॉमेडी सिनेमा, मराठी चित्रपट “धांगड धिंगा” पासून प्रेरित होता. गोविंदा आणि सुष्मिता सेन यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
