शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सर्व दोषांसह स्वीकारुन लग्न करणं अवघड”, नवऱ्याबद्दल बोलताना हिना खान ढसाढसा रडली, म्हणाली, “हा माझ्यासाठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 5, 2025 | 2:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hina Khan emotional interview

"सर्व दोषांसह स्वीकारुन लग्न करणं अवघड", नवऱ्याबद्दल बोलताना हिना खान ढसाढसा रडली, म्हणाली, "हा माझ्यासाठी…"

Hina Khan emotional interview : अभिनेत्री हिना खानने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र काही काळ हिना कर्करोगाशी सामना करत असल्याचं दिसलं. कमी वयात अभिनेत्रीला या गंभीर आजाराशी दोन हात करावे लागले. अर्थात हा काळ अभिनेत्रीसाठी खूप कठीण होता. हिनाच्या केमोथेरपीच्या वेळेला तिला खूप दुःख, वेदना सहन कराव्या लागल्या. या तिच्या वेदना इतर कोणीही कमी करु शकणार नव्हतं मात्र तिला मानसिक आधार देण्यासाठी तिचा नवरा रॉकी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. हिनाच्या पडत्या काळात तिला बॉयफ्रेंड आणि आता नवरा असलेल्या रॉकीने खूप साथ दिली.

२०२४ हे वर्ष हिनासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी खूप कठीण होतं. ऐन तारुण्यात आणि करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीला कर्करोगाचा सामना करावा लागला. मात्र या सगळ्यात अभिनेत्री कुठेही थांबली नाही, किमोथेरपी घेऊनही तिने कामामध्ये तितकाच सहभाग दर्शविला. या अभिनेत्रीच्या कठीण काळात तिला तिचा पती रॉकी जयस्वालची खूप साथ लाभली. अभिनेत्री नुकतीच तिच्या पतीसह ‘पती पत्नी और पंगा’ या टेलिव्हिजन कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी अभिनेत्री भावुक झालेली दिसली.

आणखी वाचा – शूटिंगचा अखेरचा दिवस अन् डोळ्यांत पाणी, ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका ‘या’ दिवशी घेणार निरोप, कलाकार भावुक

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की हिना खानला या शोमध्ये आल्यानंतर अश्रू अनावर झाले. तिच्या कर्करोगाच्या प्रवासाबद्दल सांगताना तिला हे अश्रू अनावर झाले होते. नवऱ्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “हा माझ्यासाठी खूप करतो. जेव्हा तुम्ही एका भावनिक प्रवासातून जात असता, तेव्हा त्या जोडीदारासाठी एका स्त्रीला तिच्या सर्व दोषांसह स्वीकारुन तिच्यासह लग्न करणं खूप अवघड असते”, यावेळी तिने तिला झालेल्या कर्करोगाबद्दल सांगितलं आहे.

आणखी वाचा – कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करने गाठलं स्वयंपाकघर; पहिल्यांदाच बनवली ‘ही’ खास डिश, सासऱ्यांकडून कौतुक

हिनाचा नवरा रॉकी पुढे यावर म्हणाला, “जर दोष असे असतील तर मी १० वेळा तुझ्यासह लग्न करेन”. हे ऐकून रडत असलेली हिना स्मित हास्य करताना दिसली. यावेळी सोनाली बेंद्रने टाळ्या वाजवत रॉकीचं कौतुक केले. ‘पती पत्नी और पंगा’ या शोचे सोनाली बेंद्रे आणि मुन्नवर फारुकी सुंत्रसंचालन करत आहेत.

Tags: entertainmenthina khanHina Khan emotional
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

ankita lokhande vicky jain abu dhabi vacation
Entertainment

हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मराठी असूनही…”

मे 29, 2026 | 10:20 am
The Maharashtra Files Marathi Movie
Entertainment

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे तांत्रिक अडचणी आणि सेन्सॉर बोर्डाच्या बदलांमुळे प्रदर्शन पुढे, नवीन तारीख लवकरच होईल जाहीर

मे 29, 2026 | 12:00 pm
shashank shende role in ghabadkund
Entertainment

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, ‘घबाडकुंड’ चित्रपटातील लूकची चर्चा

मे 28, 2026 | 10:01 am
veteran actor ramakant dayama death
Entertainment

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्याचे निधन, वयाच्या ६५व्या वर्षी निधन, सहकलाकाराची भावुक पोस्ट

मे 26, 2026 | 2:16 pm
Next Post
Women Special Article

"बरं झालं मुलगा झाला", हे ऐकणं जास्त महत्त्वाचं की 'ती'च्या वेदना?, बाईचा दुसरा जन्म आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.