गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कीटक चावल्याने होणारा संसर्ग इतका धोकादायक?, सुप्रसिद्ध अभिनेता करतोय सामना, तीव्र वेदना आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 11, 2026 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rajesh Sharma Infection

कीटक चावल्याने होणारा संसर्ग इतका धोकादायक?, सुप्रसिद्ध अभिनेता करतोय सामना, तीव्र वेदना आणि…

Rajesh Sharma Infection : बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मा हे सध्या रुग्णालयात दाखल आहेत. रिपोर्ट्सनुसार, प्रभासच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना काही कीटक किंवा विषारी कोळी चावला होता. सुरुवातीला किरकोळ समस्या समजून त्यांनी शूटिंग पूर्ण केले, परंतु काही तासांनंतर, त्यांच्या पायात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळू लागली. कोलकत्याला परत येईपर्यंत त्यांना खूप ताप आला, त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. कीटक चावल्यामुळे होणारा संसर्ग किती धोकादायक असू शकतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

कीटक चावणे किती धोकादायक आहे?

डास, मुंगी, मधमाशी किंवा इतर लहान कीटक चावल्यामुळे किंचित खाज येणे, लालसर होणे किंवा सूज येणे हे सामान्य मानले जाते, परंतु काही प्रकरणांमध्ये या लहान जखमेमुळे गंभीर संसर्ग होऊ शकतो. चावणारा कीटक जर विषारी असेल किंवा त्यातून जीवाणू शरीरात पोहोचले तर परिस्थिती झपाट्याने बिघडू शकते.
आरोग्याविषयी माहिती देणारी वेबसाईट हेल्थलाइनच्या तज्ज्ञांच्या मते, कीटक चावल्याच्या ठिकाणी लालसरपणा वाढू लागला, सूज पसरू लागली, तीव्र वेदना होत असतील, पू बाहेर पडू लागला किंवा ताप येऊ लागला तर त्याला हलके घेऊ नये. ही सर्व चिन्हे असे दर्शवतात की संसर्ग शरीरात पसरत आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास ते त्वचेच्या खोल थरांपर्यंत पोहोचू शकते.

आणखी वाचा – “बापाला मरताना नाही पाहायचंय”, ‘सैराट’ फेम अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, वडिलांची प्रकृती गंभीर आणि…

समस्या कधी गंभीर होऊ शकते?
काही प्रकरणांमध्ये, हा संसर्ग सेल्युलाईटिससारख्या गंभीर आजाराचे रूप घेऊ शकतो. यामध्ये बॅक्टेरिया त्वचेत आणि त्याखालील ऊतींमध्ये वेगाने पसरू लागतात. यावर वेळीच उपचार न केल्यास संसर्ग रक्तापर्यंत पोहोचतो आणि जीवघेणी स्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे कीटक चावल्यानंतर होणाऱ्या असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला डॉक्टर सतत देतात. चाव्याच्या ठिकाणाहून शरीराच्या इतर भागांकडे लाल रेषा दिसल्यास, लिम्फ नोड्स सुजल्या किंवा तीव्र थंडी वाजून ताप येऊ लागला, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. काही लोकांमध्ये, कीटकांच्या विषामुळे किंवा ऍलर्जीमुळे, श्वास घेण्यास त्रास होणे, चेहरा किंवा घसा सुजणे आणि बेशुद्ध होणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशी परिस्थिती वैद्यकीय आणीबाणी मानली जाते.

आणखी वाचा – “दोषी ठरलो तर मला त्याच मंदिरासमोर फासावर द्या”, एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर आदेश बांदेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “पुरावे नसताना…”

हे आहेत प्रतिबंधाचे उपाय?

संसर्ग टाळण्यासाठी, सर्वप्रथम चावलेला भाग साबणाने आणि स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवावा. खाज येत असल्यास, वारंवार खाजवणे टाळा, कारण यामुळे जखमेच्या आत बॅक्टेरिया पोहोचू शकतात. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक क्रीम किंवा इतर औषधे वापरली जाऊ शकतात. दुखणे, सूज किंवा ताप वाढत राहिल्यास, विलंब न करता रुग्णालयात पोहोचणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

Tags: entertainmenthealth updaterajesh sharma
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Monsoon Health Tip

पावसाळ्यात सर्वाधिक पसरणारे ७ आजार कोणते? त्यांना टाळण्याचे सोपे मार्ग…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.