‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे, आणि इतकी वर्ष सुरु असणारी ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आजवर रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील सर्वांचं आवडत पात्र म्हणजे भिडे मास्तर. “मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी” असं म्हणणारे भिडे मास्तर विशेष लोकप्रिय आहेत. भिडे मास्तर ही भूमिका अभिनेते मंदार चांदवडकर साकारत आहेत. आज मंदार चांदवडकर यांचा वाढदिवस आहे. (Mandar Chandwadkar struggle story)
मालिकेत घेतल्या जाणाऱ्या नावाने लोक त्या पात्राला ओळखू लागतात, असंच काहीस घडलं आहे, अभिनेते मंदार चांदवडकर यांच्या सोबत. गेली १४ वर्षे अभिनेते मंदार चांदवडकर भिडे मास्तर ही भूमिका साकारत आहेत. हे पात्र इतकं प्रसिद्ध झालं आहे की लोक त्यांना त्यांचं खरं नाव विसरून मालिकेतल्या नावाने ओळखतात.
पाहा मंदार चांदवडकरांनी नोकरी सोडून का निवडलं अभिनयक्षेत्र (Mandar Chandwadkar struggle story)
एका मुलाखती दरम्यान मंदार यांनी याबाबतचा खुलासा केला, ‘टीव्हीवर पाहणारे लोकच नाही, तर त्यांचे शेजारी आणि आजूबाजूचे लोकही त्यांना ‘भिडे’ या नावानेच ओळखतात. इतकचं नाही तर, त्यांच्या घरातील धोबी आणि किराणा मालाचे बिल सुद्धा श्री. भिडे यांच्या नावावर येत.’
हे देखील वाचा – गश्मीर महाजनीच्या आईच्या सांगण्यावरून ‘या’ अभिनेत्याने त्याच्या आयुष्याला मिळवून दिली कलाटणी
अभिनेते मंदार चांदवडकर यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आणि त्या नंतर मंदार नोकरीसाठी दुबई येथे गेले. तिथे गेल्यावर त्यांची अभिनयाची आवड त्यांना काही शांत बसू देत नव्हती. अखेर २००० साली ते दुबई येथील नोकरी सोडून मुंबईत आले आणि नाटक आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करू लागले. २००८ साली त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेची ऑफर आली. या मालिकेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली अन् त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
