प्रेम, शाळा, कॉलेज अशा अनेक जवळच्या विषयांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट येत असतात. असं म्हणतात पहिलं प्रेम कोणाला कधीच विसरता येत नाही मग ते शाळेतील असो वा कॉलेज मधील असो. अनेक बऱ्याच प्रेम कहाण्यांमध्ये हे पहिलं प्रेम कोणाला सहज मिळत नाही असं देखील पाहायला मिळत. पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा असाच एक चित्रपट लावरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काय असत पहिलं प्रेम आणि खऱ्या प्रेमाचं पुढे काय होत हे दाखवण्याच्या या नव्या कोऱ्या कथेचं नाव आहे “गेट टुगेदर”.(Get together marathi movie)

या चित्रपटाचा धुमाकूळ घालणारा टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या १९ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. पावसाळी वातावरणात एकांतात असलेलं जोडपं टीजरमध्ये दिसतं आणि पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या संवाद ऐकू येतो. चित्रपटाचा टीजर रोमँटिक असल्यानं या चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेतील त्रिशा कमलाकर, “देवमाणूस” या गाजलेल्या मालिकेतील एकनाथ गिते, अॅटमगिरी, वाघेऱ्या या चित्रपटात काम केलेली श्रेया पासलकर या कलाकारांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.(Get together marathi movie)
सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांचे आहे.सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, जावेद अली गायिका आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे यांनी चित्रपटातली सुमधुर गाणी गायली आहेत. तर अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे.