सोनी मराठीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा” शोमधून घराघरात पोहोचलेला फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे सध्या चर्चेत आहे. स्किटदरम्यान गौरवच्या विनोदाची वेगळी शैली आणि अचूक टायमिंग प्रेक्षकांना हसवून जाते. त्याचा सतत होणार अपमान हा जरी प्रेक्षकांना थोडा खटकत असला. तरी गौरव त्या अपमानाचा पुरेपूर आनंद तर घेतोच, शिवाय त्याचा बदला तो स्किटमध्ये हमखास घेतो.(Gaurav More London Trip)
स्टॅन्डअप कॉमेडी शो पासून करिअरची सुरुवात करणाऱ्या गौरवला प्रचंड स्ट्रगल करावा लागला. त्याने एक एकांकिका केली होती, मात्र ऐनवेळी गौरवला त्या एकांकिकेतून काढून टाकण्यात आलं. त्या घटनेतून प्रेरणा घेत गौरवने आज स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. गौरवने कॉमेडी शो, एकांकिका व नाटक करण्याबरोबर मराठी मालिका व सिनेमेही केले असून ‘संजू’ या हिंदी सिनेमातही गौरवची झलक आपल्याला पाहायला मिळाली होती.

काही महिन्यांपूर्वी गौरव त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटसाठी लंडनला गेला होता. त्यावेळचा एक व्हिडिओ नुकतंच व्हायरल झालाय. ज्यात गौरव लंडनमध्ये वडापाव खात असून तो तिकडे वडापावचं कौतुक करताना दिसतोय. “अख्ख्या जगात कुठेही जा, पण वडापावशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. त्याच्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटतच नाही.” असं गौरव ह्या व्हिडिओमध्ये म्हणतो. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनीषा शिंदेने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला असून ज्यात ती गौरवसोबत वडापाव खाताना दिसतंय. गौरवचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून चाहते या पोस्टवर विविध प्रतिक्रिया देत आहे.
हे देखील वाचा – ‘गदर २’ मध्ये नाना पाटेकरांची एन्ट्री; या भूमिकेतून येणार समोर
गौरव त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटमध्ये बिझी असून या सिनेमात गौरवसोबत अभिनेता भारत जाधव, निखिल चव्हाण व अभिनेत्री माधुरी पवार आदी कलाकार दिसणार आहेत. त्याचबरोबर गौरव विविध ॲड्समध्ये काम करत असून सोशल मीडियावर गौरववरचे अनेक व्हिडिओस व मीम्स सध्या धुमाकूळ घालतायत.(Gaurav More London Trip)