गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 3, 2025 | 4:23 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Zepto News

झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

Zepto News  : आजकाल आपल्याला घरबसल्या काय हवं नको ते मिळतं. हो कारण ऑनलाईन सेवा पद्धतीने या गोष्टी अधिक सुखकर केल्या आहेत. बाजारात जाऊन काही विकत आणण्याऐवजी आपण घरबसल्या वस्तू खरेदी करु शकतो. अर्थात बऱ्याच कंपन्यांनी या संधी प्रेक्षकांसाठी सुरु केल्या आहेत. घर बसल्या तुम्ही एखाद्या मॉलप्रमाणे तुम्ही जे हवं ते हवं तेव्हा मागवू शकता. ऑर्डर केल्यावर तुम्हाला तुमचे पार्सल अवघ्या १०-२० मिनिटांमध्ये रायडर घरपोच आणून देतं. यांत झेप्टो कंपनीचा आवर्जून उल्लेख केला जातो. ऑनलाइन किराणा डिलिव्हरी सेवा देणाऱ्या ‘किरणाकार्ट टेक्नोलॉजीज प्रा. लि.’ (झेप्टो) ही कंपनी गेले अनेक दिवस ग्राहकांचे मन जिंकत आहे.

घरपोच, फार कमी वेळात आणि मुख्यत्वे केवळ खाद्यपदार्थ नाहीतर उपयुक्त वस्तूही झेप्टोवरुन कोणत्याही वेळेला आपण ऑर्डर करु शकत होतो. आता मात्र झेप्टोवरील ग्राहकांच्या विश्वासाला तडा जातो की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. झेप्टोच्या स्टोरवरील छाप्यामुळे याचा फटका कंपनीसह ग्राहकांनाही बसणार असल्याचं चित्र दिसत आहे. सुरुवातीला सुरळीत चालणारी ही झेप्टो कंपनी कालांतराने चुकीच्या गोष्टींमुळे चर्चेत येऊ लागली. आता तर काय या कंपनीने अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केले.

आणखी वाचा – धक्कादायक! ऊसतोडीला जाण्यापूर्वी हजारो महिलांनी गर्भपिशवीच काढली, भयाण सत्य समोर

या कंपनीकडून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती ‘एफडीए’ला मिळाली होती. त्यानुसार धारावी येथील गोदामावर अचानक छापा टाकला. यावेळी तपासणीदरम्यान काही अन्नपदार्थांवर बुरशी आढळली. तसेच हे पदार्थ साचलेल्या, तसेच अस्वच्छ पाण्याजवळ ठेवण्यात आले होते. ज्या पदार्थांची साठवणूक शीतकपाटामध्ये केली होती, तेथील तापमानही नियमानुसार नव्हते. अशा अनेक गोष्टी निदर्शनास आल्याने आता कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, याच वर्षी केलं होतं लग्न, हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर

झेप्टो कंपनी मार्केटमध्ये चर्चेत असून नामांकित कंपन्यांना मागे टाकत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. झेप्टोची खासियत म्हणजे २४ तास ग्राहकांसाठी अविरतपणे सज्ज असणे. पण आता झेप्टो कंपनीच्या समोर आलेल्या या नव्या घोटाळ्याने ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ग्राहकांच्या विश्वासाला तडा गेल्याने आता झेप्टोवरून काही मागवायचे की नाही या प्रश्नाने संभ्रमित केलं आहे.

Tags: trending newsZepto News
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vivek oberoi on bengaluru stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”

जून 5, 2025 | 11:28 am
 Hina Khan Trolled After Marriage
Entertainment

“तुझ्या नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारला का?”, आंतरजातीय लग्न करताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, “तुझ्या आईने…”

जून 5, 2025 | 11:20 am
Hina Khan Wedding
Entertainment

११ वर्ष डेट, वडिलांचा मृत्यू आणि कॅन्सरशी लढा; प्रत्येक अडथळ्यांमध्ये हिना खानला मिळाली पतीची साथ, अखेर अडकले लग्नबंधनात

जून 5, 2025 | 11:00 am
Hina Khan Wedding
Entertainment

कॅन्सरशी झुंज तरीही हिना खानचा लग्न करण्याचा निर्णय, रॉकीसह गुपचूप केला विवाह, साडीवर ८ अंक कोरला कारण…

जून 5, 2025 | 10:37 am
Next Post
Vaishnavi Hagawane Death

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.