रविवार, सप्टेंबर 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजी परतल्या, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार ही भूमिका, पहिला फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 18, 2025 | 9:15 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Purna Aaji new entry

अखेर 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजी परतल्या, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार ही भूमिका, पहिला फोटो समोर

Purna Aaji new entry : ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळतेय. या मालिकेतील सगळेच कलाकार त्यांच्या भूमिकेने आणि अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले. मालिकेतील पूर्णा आजी ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले तेव्हा मालिकेतील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. ज्योती यांच्या निधनानंतर अनेकांच्या डोळ्यांत पाणी पाहायला मिळालं. पण शो मस्ट गो ऑन म्हणत ही भूमिका पुन्हा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने आणि ‘ठरलं तर मग’च्या निर्मात्यांनी पुन्हा भेटीस आणली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ही भूमिका कोण साकारणार याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आता नव्या पूर्णा आजी कोण आहेत हे समोर आलं आहे. यापूर्वी स्टार प्रवाहने पाठमोऱ्या पूर्णा आजीच्या भूमिकेत एक व्हिडीओ शेअर करत ही उत्सुकता वाढविली होती. “अन्नपूर्णा निवासात पुन्हा एकदा आनंद घेऊन येणार पूर्णाआजी” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ समोर आलेला. सदर प्रोमोवर आलेल्या कमेंटने या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी दिसणार असल्याचं स्पष्ट केलं.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजीच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी?, प्रोमो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स, उत्सुकता वाढली

अखेर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने आणि मालिकेच्या टीमने पूर्णा आजी ही भूमिका रोहिणी हट्टंगडी साकारणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे. रोहिणी हट्टंगडी ठरलं तर मग मालिकेतून पूर्णा आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. आता पुन्हा एकदा त्यांनी ठरलं तर मग मालिकेतून मालिकाविश्वात कमबॅक केलं आहे.

आणखी वाचा – Video : कुटुंबाचं पत्र पाहून प्रणित मोरे ढसाढसा रडला आणि…; इतर स्पर्धकांच्याही डोळ्यांत पाणी

अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना आजही त्यांचा चाहतावर्ग मिस करतोय. अर्थात त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण मालिकेच्या कथानकाच्या गरजेनुसार ही भूमिका मालिकेत परत आणणं आवश्यक होतं, त्यानुसार आता मालिकेत पूर्णा आजी ही भूमिका अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या वाट्याला आली आहे. अर्थात रोहिणी ताई ही भूमिका उत्तम साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करतील यांत शंकाच नाही.

Tags: purna aajistar pravahTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
Dhanteras 2025

धनत्रयोदशीला आपण १३ दिवे का लावतो?, यमराजापासून ते देवी लक्ष्मीपर्यंत, प्रत्येक दिव्याचे महत्त्व आणि योग्य स्थान कोणते?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.