पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. २६ पर्यटकांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. आता यालाच भारताने प्रत्युत्तर दिलं आहे. ६ मेला रात्री १ वाजून ५ मिनिटांनी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या एकूण ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. १ वाजून ३० मिनिटांपर्यंत ही मोहिम सुरु होती. अवघ्या २५ मिनिटांमध्ये भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. आता या मोहिमेची जगभरात चर्चा सुरु आहे. भारतीय या मोहिमेचं कौतुक करत आहेत. मात्र आता एक संतापजनक बाब समोर आली आहे. पाकिस्तानी कलाकारांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला विरोध दर्शवला आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे राग व्यक्त केला आहे. (Pakistani actors support oppose operation sindoor)
पाकिस्तानी कलाकारांचा संताप
ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीयांना आज सकाळी संपूर्ण माहिती मिळाली. भारतीय या मोहिमेबाबत आनंद व्यक्त करत आहेत. मात्र पाकिस्तानी कलाकारांना याचा पुळका आला आहे. पाकिस्तानात भारताने हल्ला केला. तेथील लोक मारले गेले. याचा आनंद व्यक्त करणं अत्यंत वाईट असल्याचं या कलाकारांनी म्हटलं आहे. सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करताच अनेकांनी पाकिस्तानी कलाकारांना चांगलंच सुनावलं आहे.
भारताने क्रुर कृत्य केलं
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर म्हणाली, “माझ्याकडे आता बोलण्यासाठी चांगला असा कोणताच शब्द नाही. आता राग, दुःख आणि दुःखद भावनेने हृदय जड झालं आहे. एक मुलगा गेला. कुटुंब विभक्त झाले आणि हे सगळं कशासाठी?. असं करुन तुम्ही कोणाचीच सुरक्षा करु शकत नाही. ही पूर्णपणे क्रुरता आहे. निष्पाप लोकांवर हल्ला करत तुम्ही राजकारण करु शकत नाही. ही ताकद नाही तर लज्जास्पद आहे. आम्ही तुमचं सगळं कृत्य बघत आहोत”. पुढे ती म्हणाली, “पहलगाम हल्ल्यानंतर एकाही पाकिस्तानी व्यक्तीला मी जल्लोष करताना पाहिलं नाही. पण हातावर न मोजण्याइतके भारतीय ट्वीटरद्वारे जल्लोष करत आहेत. आनंद साजरा करत आहेत”.
अल्लाह देशाचं रक्षण कर
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानलाही ऑपरेशन सिंदूरनंतर राग अनावर झाला. तिनेही सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला. ती म्हणाली, “ही क्रुरता. अल्लाह आपल्या देशाचं रक्षण कर. आपल्याला बुद्धी देवो. आमिन”. माहिरा पाकिस्तानातील स्थायिकांसाठी प्रार्थना करत आहे. तसेच भारताने केलेला हल्ला म्हणजे क्रुरता असल्याचं माहिराचं म्हणणं आहे.
आणखी वाचा – पहलगाम हल्ल्यात आपला माणूस गमावलेल्या ‘ती’चा आवाज, Operation Sindoor नंतर डोळ्यांत पाणी
पाकिस्तान जिंदाबाद म्हणत…
फवाद खाननेही वादग्रस्त वक्तव्य करत संताप व्यक्त केला. तो म्हणाला, “या भ्याड हल्ल्यात जखमी व मृत पावलेल्या लोकांबाबत मी दुःख व्यक्त करतो. येत्या काही दिवसांमध्ये मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना ताकद मिळो. यामध्ये शब्दांची आणखी भर पाडून वाद पेटवू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो. सामान्य लोकांच्या जीवनाच्या तुलनेत याची किंमत मोठी नाही. लोकांमध्ये थोडीशी संवेदनाची भावना निर्माण व्हावी. पाकिस्तान जिंदाबाद”. पहलगाम हल्ल्यानंतर फवादच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपट भारतात बॅन करण्यात आला होता. आता पाकिस्तानी कलाकारांनी संताप व्यक्त करत वाद आणखी वाढवला आहे.