भारती सिंह नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर धमाल-मस्ती करताना दिसते. अनेकदा ती तिच्या मैत्रिणींबरोबर गमतीच्या मूडमध्ये धमाल करताना दिसते. पण अलीकडेच भारतीने तिच्याविरोधात होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केले आहे. यावेळी भारतीने ऑनलाइन ट्रोलर्सला उत्तरही दिले आहे. नेटकऱ्यांकडून करण्यात येणार ट्रोलिंग भारती मनावर न घेता स्वतःचा आत्मविश्वास गमावत नाही. तिच्या अलीकडील व्लॉगमध्ये, भारतीने ट्रोलिंगचा सामना करण्याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “जेव्हाही मी फोटो पोस्ट करते तेव्हा मला पांडा, गेंडी अशा कमेंट येतात, पण मला पांडा वा गेंडी बोललेलं खूप गोड वाटतं”. (Bharti singh on trolling)
भारती सिंह पुढे म्हणाली, “लोक काय लिहितात याकडे मला काही फरक पडत नाही आणि मी या कमेंट्सकडे लक्ष देत नाही. जे लोक हे लिहित आहेत त्यांची मानसिकता मी समजू शकते कारण लोखंडवाला परिसरात जाण्यासाठी ते सक्षम नाहीत आणि आम्ही सर्वत्र जात आहोत. ते मागे पडत आहेत आणि आयष्यात काहीच करत नाहीत”. ऑनलाइन ट्रोलिंग आणि टीकेचा सामना करत असतानाही, भारती ट्रोलिंगला दयाळूपणे वा मजेदारपणे हाताळते. तिच्या विनोदाच्या उत्तम टायमिंगमुळे ओळखल्या जाणाऱ्या, भारतीने स्वतःसाठी एक स्थान तयार केले आहे. भारती ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ सारख्या स्टँड-अप कॉमेडी शोद्वारे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली. यामधील तिची लल्ली ही व्यक्तिरेखा घराघरात लोकप्रिय झाली.
अगदी लहानश्या खेडेगावातून आलेल्या आणि कुणीही वारसा हक्क नसताना तिने केलेली मेहनत आणि तिचा प्रवास प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. भारती ‘कॉमेडी सर्कस’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘नच बलिये’ यासह अनेक रिॲलिटी शोचा भाग झाली. पती हर्ष लिंबाचियाबरोबरच्या ‘खतरा खतरा’सारख्या शोमध्ये तिच्या होस्टिंगचेही खूप कौतुक झाले आहे, ज्यामुळे तिची लोकप्रियता वाढली आहे.
सध्या भारती ‘लाफ्टर शेफ्स-अनलिमिटेड एंटरटेनमेंट’मध्ये दिसत आहे. शोनुसार, सेलिब्रिटी शेफ कोच हरपाल सिंग सोखी आणि भारती सिंग प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेतात आणि कोणाला स्टार मिळणार हे ठरवतात. या शोमध्ये टेलिव्हिजन व शोबिझमधील १२ सेलिब्रेटी आहेत, ज्यात राहुल वैद्य याचाही समावेश आहे, जो अली गोनीबरोबर पाहायला मिळतो.