अनेक कलाकार बऱ्याच प्रोजेक्ट्स मधून अभिनय करूनही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी अपयशी ठरतात परंतु काही कलाकार असे असतात जे आपल्या आयुष्यातील पहिल्याचं कामगिरीत प्रेक्षकांची मन जिंकतात. या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे हॉलिवूड अभिनेता एंगस क्लाउड. HBO वरील प्रसिद्ध सिरीज ‘यूफोरिया’ मधून एंगस प्रेक्षकांच्या भेटीला आला परंतु दुर्दैवाने वयाच्या २५ व्या वर्षी एंगसच अकाली निधन झालं. त्यामुळे संपूर्ण हॉलिवूड जगतात शोककळा पसरली आहे. एंगसच्या कुटुंबाकडून एंगसच्या निधनाची बातमी कळवण्यात आली. सोमवारी सकाळी अचानक एंगसचा मृत्यू झाला परंतु त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार केलिफोर्निया येथे राहत्या घरी एंगसचे निधन झाले असून निधनाचे नक्की कारण काय आहे याचा तपास सुरु आहे.(angus cloud death)

रिपोर्टनुसार मागील आठवड्यात एंगसने आपल्या वडिलांना गमावलं. त्यांच्या आठवणीतून सावरताना त्याला त्रास होत होता असं देखील सांगण्यात आलं आहे. HBO चॅनलच्या इंस्टाग्राम वरून एंगस क्लाउडसाठी एक पोस्ट कण्यात आली आहे. या पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिण्यात आलं आहे “एंगस क्लाउडच्या निधनाबद्दल जाणून घेतल्याने आम्हाला आश्चर्यकारकपणे दुःख झाले. तो प्रचंड हुशार होता आणि एचबीओ आणि युफोरिया कुटुंबाचा लाडका भाग होता. या कठीण काळात आम्ही त्यांचे मित्र आणि कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो.”.(angus cloud passed away)
HBO वरील ‘यूरोपिया’ या सिरीज मध्ये एंगसने आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती. अमेरिकेतील तरुणांना नशेच्या आहारी जाऊन केल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीवर आधारित ही सिरीज आहे. ज्या मध्ये फेजको हे पात्र साकारत होता. एंगसच्या चाहत्यांसोबतच हॉलिवूड मधील अन्य कलाकारांनी देखील एंगसला श्रद्धांजली वाहिली आहे.(angus cloud euphoria)