प्रेमाला वय आणि बंधन नसतं म्हणतात तेच खरं आहे. आजवर अशा अनेक लग्नाच्या बातम्या आपण पाहिल्या किंवा वाचल्या असतील, ज्यांनी त्यांच्या वयाच्या उत्तरार्धात आपल्या जोडीदारासह पुन्हा एकदा नव्याने रेशीमगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेते आशीष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी लग्नगाठ बांधली. अशातच आता सोशल मीडियावर आणखी एका वृद्ध जोडप्याच्या लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका वृद्ध आजी-आजोबांनी त्यांच्या लग्नाच्या ६०व्या वाढदिवसानिमिता पुन्हा एकदा नव्याने लग्नगाठ बांधली आहे. आयुष दळवी या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यामध्ये वृद्ध आजोबा व आजी हे एका नवविवाहीत दाम्पत्याप्रमाणे सजलेले पाहायला मिळत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबांनी पांढऱ्या रंगाचा धोतर, कुर्ता व त्यावर पांढरी टोपी परिधान असा पेहराव केला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबार त्यांनी डोक्याला फुलांच्या मुंडावल्या लावल्या आहेत. तर आजींनी आकाशी रंगाची भरजरी नक्षीकाम असलेली पैठणी साडी परिधान केली असल्याची पाहायला मिळत आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या आजी-आजोबांच्या नातलगांनी मिळून त्यांचे हे लग्न लावले आहे.
आणखी वाचा – अद्वैत व नेत्राला हवं आहे स्वत:चं मुल, विरोचकाचे संकट असताना गरोदरपणाचा निर्णय घेणार का? नवा ट्विस्ट
मंगलाष्टके गात, अक्षतांची उधळण करत व एकमेकांना वरमाला परिधान करत अगदी धुमधडाक्यात नातलगांनी व जवळच्या नातेवाईकांनी या आजी-आजोबांचे थाटामाटात लग्न लावले आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनीदेखील लाईक्स व कमेंट्सद्वारे तुफान प्रतिसाद दिला आहे. “खूप छान, किती गोड, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, खूप दोघे नशीबवान आहेत, देव तुम्हाला आणखी अनेक वर्षे असेच एकत्र ठेवो” अशा अनेक कमेंट्सद्वारे या आजी-आजोबांच्या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.