टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये भारती सिंह व हर्ष लिंबाचिया ही लोकप्रिय जोडी आहे. ते नेहमी व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. काही दिवसांपूर्वी भारतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी ती कोणत्या परिस्थितिमधून गेली हे सर्व चाहत्यांबरोबर व्लॉगच्या माध्यमातून शेअर केले होते. ती बरी झाल्यानंतर घरी जातानादेखील व्लॉगच्या माध्यमातून माहिती शेअर केली होती. आता पुन्हा एकदा भारती व हर्ष एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. तिने आता शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शिका फराह खान देखील दिसत आहे. (bharati singh on food)
भारतीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हर्ष,फराह व भारती एका फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात. त्यावेळी तिथे त्यांना एक पदार्थ वाढला जातो. पदार्थ आशियायि व्यंजन आहे. त्यामुळे एक भारतीय महिला असल्याने मेन्यूबद्दल खूप चर्चा झाली. यामध्ये सुशी हा पदार्थ असल्याने तिला ते खाण्याची इच्छा नव्हती. तसकह काहीतरी भारतीय खाण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
भारतीने सांगितले की, “आम्ही फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जात आहोत हे ऐकून माझा मूड खूप खराब झाला. फराह मॅम नेहमी छान छान पदार्थ घेऊन येतात. त्या माझ्यासाठी नेहमी यखनी किंवा असंच काहीसं घेऊन येतात. मला आशा आहे की त्या आम्हाला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातील”. हर्ष म्हणाला की, फराह मॅम आमच्यासाठी आईसारख्या आहेत. त्या आमच्यासाठी नेहमी उभ्या असतात. पॉडकास्टसाठी असो वा जेवणासाठी असो त्या नेहमी असतात”.
भारती पुढे म्हणाली की, “त्या एक सुपरवुमन आहेत. तीन मुलांचा सांभाळ करतात. जेवण बनवतात. सगळंकाही स्वतः मॅनेज करतात”. पण रेस्टॉरंटमध्ये सुशी पाहिल्यानंतर भारतीचा मूड जातो. तब्बल 24 कॅरेट सोन्याचा मुलामा असलेली सुशी मागवली होती. त्यावर भारती म्हणाली की, “मला लाज वाटत आहे. ट्रफल काय असते हेच मला माहीत नाही. याची किंमत सुमारे दीड लाख रुपये प्रतीकिलोग्राम आहे. यापेक्षा मी सोन्याची चैन बनवणे पसंत करेन”.
त्यानंतर अजून एक पदार्थ भारतीच्या समोर आली. या पदार्थाचे नाव ‘ब्लॅक फंगस उडोन’ असे होते. सर्व जेवण भारतीला आवडले. शेवटी भारती म्हणाली की, “१४०० रुपयांचा फंगस खाऊन आले आहे. मी आता घरी जाऊन काय सांगू? की मी फंगस खाऊन आले आहे म्हणून?”.
भारतीच्या या व्हिडीओला प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळत आहे.