पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ची घोषणा केली. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतावादी तळ उद्धवस्त करण्यात आले. या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही हल्ला करण्यास सुरुवात केली. आता भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. सीमेलगतही तणाव असताना सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सुरक्षा प्रथम हवी हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील अनेक मंदिरात नारळ, फुलं, हार प्रसाद नेण्यासाठी बंदी घालण्यात आली. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरातही या नियमाचं पालन केलं जात आहे. मात्र या निर्णयानंतर नारळ, हार, फुल विक्रेतांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यांचं हातावर पोट असल्यामुळे हाल सहन करावे लागत आहेत. (Siddhivinayak temple news)
‘एबीपी माझा’ने सिद्धीविनायक मंदिर परिसात नारळ, फुल, हार विक्री करणाऱ्यांची सत्य परिस्थिती समोर आणली. एक विक्रेता म्हणाला, “आमचं पोट या व्यवसायावर चालायचं. आमच्या मुलांचं शिक्षण, घरदार यावरच चालायचं. मंदिर प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हे बंद केलं आहे. पुन्हा कधी चालू करणार? याची आम्ही वाट बघत आहोत. घर आमचं याच्यावरच आहे. त्याचं सगळं नुकसान झालं आहे”.
आणखी वाचा – Video : साडीचा पदर खेचला, खाली पाडलं अन्…; महिलेवर माकडांचा विचित्र हल्ला, अशी परिस्थिती केली की…

महिला विक्रेता म्हणाली, “पहिला ५०० रुपये दिवसाला धंदा होत होता. आता २५० किंवा २०० रुपयेच कमाई होते. पुढे हळूहळू आणखीनच कमी होणार. विक्री करणारी माणसं खूप आहेत. धंदा कमी झाला आहे. या सगळ्या घटनेमुळे मंदिरात माणसं येणंही कमी झालं आहे”. तर दुसऱ्या एका महिला विक्रेतेने सत्य परिस्थिती सांगितली. “आम्ही नारळ, मोदक, हार सगळं विकत होतो. भाविक यायचे ते हे सगळं आमच्याकडून विकत घेत होते. आता निर्णयानंतर आमच्याकडून हे सगळं कोणीच घेत नाही. आम्हाला धंदाही नाही”. असंही काही विक्रेते म्हणाले.
आणखी वाचा – Video : आईच्या मृतदेहासमोर दोन भावांमध्ये राडा, लेक चितेवर झोपला अन्…; स्मशानभूमीत पुढे असं काही घडलं की…
एका महिला विक्रेतेने कुटुंब, मुलांचं शिक्षण याविषयी प्रश्न उपस्थित केला. ती म्हणाली, “आम्ही पहिल्यापासून दुर्वा, फुलंच विकत आलो आहोत. आमची तीन मुलं आहेत. शिक्षणाची ही सगळी मुलं आहेत. मेहनत करुन आम्ही त्यांना शिकवत असतो. दुर्वा, फुलं विकण्यावरच आमचं पोट चालतं”. पुढे विक्रेते म्हणाले, “आम्हाला खूप दुःख होत आहे. आमची फुलंही कोण आता घेत नाही. आता आम्ही काय करणार?. पुन्हा कधी सगळं सुरु होणार? याचीच आम्ही वाट बघत आहोत. मुलगा माझा कामाला जातो. एकतर आम्ही भाड्याने राहतो. पण त्याच्या पगारात काही भागत नाही. म्हणूनच हे काम करत होते”. सुरक्षा म्हणून घेतलेला निर्णय चांगला असला तरी विक्रेतांच्या खासगी व आर्थिक आयुष्यावर याचा परिणाम झाला आहे.