शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कंगना रणौतला बिनधास्त कानाखाली मारल्यानंतर CISF महिलेने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी आई जेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 8, 2024 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
CISF women guard kulwinder kaur reacts after slapping Kangana Ranaut video viral on social media

Video : कंगना रणौतला बिनधास्त कानाखाली मारल्यानंतर CISF महिलेने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, "माझी आई जेव्हा…"

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने मंडी मतदार संघातून निवडणूक लढवली होती आणि यात तिचा विजय झाला आहे. त्यामुळे गेले काही दिवस ती चांगलीच चर्चेत आहे. चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने कानाखाली लगावली. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या प्रकरणाची सध्या खूपच चर्चा होत आहे. या सीआयएसएफ महिला कर्मचारी कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आले आहे. अशातच त्या महिला कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये ती चंदीगड विमानतळावर भाजप खासदार कंगना रणौतबद्दल राग व्यक्त करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओ मध्ये ती महिला कर्मचारी शेतकरी आंदोलन आणि कंगणाच्या वादग्रस्त विधानाचा संदर्भ देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये महिला कर्मचारी कंगणाबद्दल राग व्यक्त करत “माझी आई त्यावेळी आंदोलनाला बसली होती. ही (कंगणा) तिथे होती का?” असं रागाने म्हणताना दिसत आहे. चंदीगड विमानतळावर तपासणीदरम्यान कंगणाला सीआयएसएफ महिला कर्मचारीने कानशिलात लगावली. या प्रकरणानंतर कंगनाचे अनेक चाहते व समर्थक दुखावले असले तरी तिने स्वत:ला ठीक असल्याचे जाहीर केले आहे.

CISF constable who slapped Kangana Ranautpic.twitter.com/9TZ9jb9XtH

— Aryan (@chinchat09) June 6, 2024

एक व्हिडीओ शेअर करत तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मला अनेकांचे फोन येत आहेत. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान चंदीगढमध्ये ही घटना घडली. मी सुरक्षा तपासणीदरम्यान जात होते. त्यावेळी दुसऱ्या कॅबिनमध्ये सीआयएसएफची एक सुरक्षारक्षक महिला कर्मचारी होती. मी त्यांच्या पुढे निघून जाण्याची त्यांनी वाट पाहिली. मी पुढे निघून गेल्यानंतर माझ्या बाजूने येत त्यांनी माझ्यावर कानशिलात लगावली. मी त्यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात.”

तसेच यापुढे कंगणाने “पंजाबमध्ये आंतकवाद आणि उग्रवाद वाढत असून तो कसा रोखायचा?” असा प्रश्नही उपस्थित केला आहे. दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी  या घटनेचा तपास सुरू असून आरोपींवर कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.

Tags: CISF women slapped Kangana RanautKangana Ranaut Marathi NewsKangana Ranaut News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Varun Dhawan going home with his wife and newborn baby video viral on social media

Video : बाबा झाल्यानंतर लेकीला पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर घेऊन आला वरुण धवन, रुग्णालयामधून घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.