रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Dinesh Phadnis Passes Away : दिनेश फडणीसांच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, १५ दिवसांपूर्वी होता लग्नाचा वाढदिवस अन्…; पत्नीबरोबरचे फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 5, 2023 | 5:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dinesh Phadnis Passes Away

दिनेश फडणीसांच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, १५ दिवसांपूर्वी होता लग्नाचा वाढदिवस अन्…; पत्नीबरोबरचे फोटो व्हायरल

CID Actor Dinesh Phadnis Dies at 57 : ‘सीआयडी’ या लोकप्रिय टीव्ही शोने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला होता. तब्बल वीस वर्ष सुरु असलेला हा शो अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. या शोच्या प्रेक्षकांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. फ्रेडरिक्स म्हणजेच फ्रेडीची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून दिनेश यांची प्रकृती ठीक नव्हती. अनेक अवयव निकामी झाल्याने दिनेश फडणीस यांना वाचवता आले नाही.

दिनेश फडणीस यांच्या निधनाने संपूर्ण ‘सीआयडी’ टीमला धक्का बसला आहे. तसेच सिनेसृष्टीतही शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगी असा परिवार आहे. अभिनेत्याच्या निधनाने त्यांच्या कुटुंबालाही खूप मोठा धक्का बसला आहे. दिनेश फडणीस यांच्या पत्नीला याचा मोठा धक्का बसला आहे. २० नोव्हेंबर रोजी दिनेश फडणीस यांच्या लग्नाचा वाढदिवस होता.

आणखी वाचा – दिनेश फडणीस यांच्या निधनानंतर CID फेम कलाकारांना मोठा धक्का, शिवाजी साटमही भावुक, म्हणाले, “साधा, नम्र आणि…”

अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वीच दिनेश फडणीस यांचे लग्न झाले होते. त्यानंतर ‘सीआयडी’ या लोकप्रिय शोमधील फ्रेडीची भूमिका मिळाल्याने त्यांचे कुटुंब खूप आनंदी होते. दिनेश फडणीस यांच्या पत्नीचे नाव नयना फडणीस आहे. २० नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाचा वाढदिवस साजरा करून अवघ्या १५ दिवसांतच दिनेश फडणीस आपल्या कुटुंबाला सोडून जातील असं कोणाच्याही मनातही आलं नसावं. २०१८ साली २५ वर्ष पूर्ण होताच त्यांनी सोशल मीडियावरून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर यंदा त्यांच्या लग्नाला तब्बल ३० वर्ष पूर्ण झाली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dinesh Phadnis (@dineshphadnis)

आणखी वाचा – अंथरुणाला खिळलेल्या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला सचिन पिळगांवकरांना भेटायची इच्छा, अभिनेता घरी पोहोचला अन्…; म्हणाले, “मी भेटलो पण…”

दिनेश फडणीस यांना एक मुलगी असून तिचे नाव तनू आहे. वडिलांच्या निधनाने त्यांच्या लेकीलाही खूप मोठा धक्का बसला आहे. दिनेश फडणीस यांच्या मुलीचे लग्न झाले असून तिला एक मुलगीही आहे. दिनेश नेहमीच त्यांची नात ध्रुवी बरोबरचे अनेक फोटो शेअर करत असायचे. विशेष म्हणजे त्यांचा व त्यांच्या नातीचा वाढदिवस हा २ नोव्हेंबरला एकाच दिवशी येतो.

Tags: CID actor Dinesh Phadnis death marathi newsDinesh Phadnis deadDinesh Phadnis dies at 57dinesh phadnis passes awaydinesh phadnis wedding anniversarydinesh phadnis wife
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
bigg boss 17 ankita lokhande said vicky jain folish man for calling their marriage investment

Bigg Boss 17 : विकी जैन व अंकिता लोखंडेमध्ये जोरदार भांडण, नवऱ्यालाच म्हणाली मुर्ख, गंतवणूक म्हणून लग्न केल्याच्या विधानावर भडकली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.