शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रामचरणला पुन्हा मुलगी होण्याची भीती वाटते”, चिरंजिवी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ, वंशाचा दिवा म्हणून हवा आहे मुलगा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 12, 2025 | 1:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Chiranjeevi Faces Backlash For His Remark

"रामचरणला पुन्हा मुलगी होण्याची भीती वाटते", चिरंजिवी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ, वंशाचा दिवा म्हणून हवा आहे मुलगा

Chiranjeevi Faces Backlash For His Remark : दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘ब्रह्मा आनंदम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या इव्हेंटमध्ये त्यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. यामुळे सोशल मीडियावर गदारोळ माजला आहे. या कार्यक्रमात चिरंजीवी मुख्य पाहुणे म्हणून दाखल झाले होते. या दरम्यान, त्यांनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याच्या म्हणजेच ‘नातू’ होण्याच्या इच्छेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, त्यांचा मुलगा राम चरणला पुन्हा मुलगी होणार नाही याची मला भीती आहे. चिरंजीवीवरील लोकांचा राग सोशल मीडियावर दिसत आहे. लोक असे म्हणत आहेत की, त्यांच्यासारख्या मेगास्टारची उंची सिनेमाच्या पडद्यावर इतकी मोठी आहे, याऊलट त्यांची विचारसरणी खूपच लहान आहे.

अभिनेत्याच्या वक्तव्यावरुन लैंगिक भेदभाव, म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभावाच्या गंभीर आरोपांचा सामना करावा लागत आहे. चिरंजीवी यांनी या कार्यक्रमात असेही म्हटले आहे की, जेव्हा तो घरीच राहतो तेव्हा त्याला असे वाटते की तो लेडीज हॉस्टेलमध्ये आहे, कारण त्याच्याभोवती नातींचा घोळका असतो. ‘ब्रह्मा आनंदम’ च्या इव्हेंटमध्ये चिरंजीवी म्हणाली, “जेव्हा मी घरी असतो तेव्हा मला असे वाटत नाही की मी माझ्या नातवंडांमध्ये आहे, तर असे दिसते की मी एका लेडीज हॉस्टेलमध्ये आहे. जे आजूबाजूच्या स्त्रियांनी वेढलेले आहे. मी रामचरणकडून हेच इच्छितो की, कमीतकमी यावेळी एक मुलगा त्याला हवा. जेणेकरुन आमचा वारसा पुढे जाईल, परंतु त्याची मुलगी त्याच्या डोळ्यांचा तारा आहे. मला भीती वाटते की त्याला पुन्हा मुलगी होईल”.

आणखी वाचा – मल्टीस्टारर ‘देवमाणूस’ चित्रपटाचे पोस्टर समोर, महेश मांजरेकर, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या लक्षवेधी भूमिका

Welcome Little Mega Princess !! ❤️❤️❤️

You have spread cheer among the
Mega Family of millions on your arrival as much as you have made the blessed parents @AlwaysRamCharan & @upasanakonidela and us grandparents, Happy and Proud!! 🤗😍

— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) June 20, 2023

सोशल मीडियावरील चिरंजीवीच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका एक्स वापरकर्त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, “चिरंजीवीला भीती वाटते की त्याचा मुलगा राम चरणला आणखी एक मुलगी होईल. २०२५ मध्ये, माणसाच्या उत्तराधिकारीसाठी अशी आवड? हे निराशाजनक आहे, परंतु आश्चर्यकारक नाही”. दुसर्‍या एकाने लिहिले आहे की, “चिरंजीवीकडून हे शब्द ऐकून फार वाईट वाटले. जर ती मुलगी असेल तर तिला खूप त्रास आहे. एक मुलगी मुलांप्रमाणेच किंवा त्याहून अधिक चांगली वारसा चालवू शकते. अशा गोष्टी चुकीचा संदेश देतात”. तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “प्रिय चिरंजीवी. मी तुमचा अभिनेता म्हणून आदर करतो. तथापि, मला तुमच्या अलीकडील विधानावर काही स्पष्टीकरण हवे आहे. हे स्त्री -विरोधी दिसते आणि असे दिसते की केवळ एक पुरुष मूल किंवा पुरुष वारसा पुढे आणू शकतो. आपण खरोखर हे सुचवू इच्छिता? आपण आपली सून ही दुसरी मुलगी असल्याच्या संभाव्यतेबद्दल अस्वस्थ आहात?”.

आणखी वाचा – विकी कौशलच्या ‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, ‘स्काय फोर्स’ आणि ‘देवा’ चित्रपटालाही टाकलं मागे, ॲडवान्स बुकींमध्ये कमावले तब्बल…

२० जून २०२३ रोजी राम चरण आणि उपसाना कोनिडेला यांनी कन्या क्लिन काराला जन्म दिला. आजोबा होताच चिरंजीवी यांनी पोस्ट शेअर करत, “स्वागत आहे, लहान मेगा प्रिन्सेस! आपल्या आगमनाच्या वेळी आपण लाखो लोकांच्या कुटुंबात आनंद पसरविला आहे”. राम चरण व्यतिरिक्त चिरंजीवीच्या कुटुंबाबद्दल बोलताना त्यांच्या स्वत: च्या दोन मुली श्रीजा कोनिडेला आणि सुश्मिता कोनिडेला या आहेत. श्रीजाला नवीश्का आणि नवरती या दोन मुली आहेत. समारा आणि संहित या दोन मुली सुशमिताच्या आहेत. राम चरण आणि उपसानाची मुलगी क्लिन कारा सर्वात लहान नात आहे.

Tags: Chiranjeevi Faces Backlash For His Remarkchiranjeevi trollentertainemnt news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Sayaji shinde talk about sindoor operation
Entertainment

“मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं”, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य, नक्की काय म्हणाले?

मे 8, 2025 | 3:06 pm
Sambhavna Seth Says Miscarriage
Entertainment

डॉक्टरांच्या चुकीमुळे पोटातच बाळ गेलं, १५ दिवस कळलंच नाही अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर धक्कादायक प्रकार, जीवाशी खेळ

मे 8, 2025 | 1:30 pm
Next Post
Rozlyn Khan Criticise Ankita Lokhande And Heena Khan

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने अंकिता लोखंडेला उघडपणे म्हटलं कुत्रा, पती व सुशांत सिंह राजपूतवरुनही हिणवलं, पण असं का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.