गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हत्या करुन तीन वर्षाच्या चिमुकलीला सुटकेसमध्ये भरलं; ‘त्या’ शेजाऱ्याला काय मिळालं?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 2, 2025 | 1:51 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Child Murder Case

हत्या करुन तीन वर्षाच्या चिमुकलीला सुटकेसमध्ये भरलं; ‘त्या’ शेजाऱ्याला काय मिळालं?

ये पोरी इथेच खेळ नाहीतर माझी नजर चुकवून काढशील लगेच पळ… अगं थांब ना का धावते?… बघ सांगितलं ना धावू नकोस पडलीस ना आता… लागलं का? सांग ना लागलं का?… आमच्या शेजारची तीन-चार वर्षांची स्वरा आणि तिच्या आईचं हे सगळं बोलणं मी आमच्या गॅलरीत उभं राहून कौतुकाने न्याहाळत होते. स्वराला थोडसं खरचटलं म्हणून तिच्या आईने किती किती आरडाओरडा केला. त्या माऊलीचा जीव अक्षरशः कासावीस झाला. त्याक्षणी मला आठवली ती तीन-साडेतीन वर्षांची तळोजामधील हर्षिका. जिने जग पाहण्यापूर्वीच आपला जीव गमावला. तोही अगदी शुल्लक कारणावरुन… शेजाऱ्यानेच त्या निष्पाप पोरीची हत्या केली. सुटकेसमध्ये भरुन पुन्हा तिच्याच (हर्षिका) घरात ठेवंल. जिच्या पोटी हर्षिकाने जन्म घेतला आज त्या माऊलीचा जीव काय म्हणत असेल याचा विचार करणंही असह्य होतंय. आज त्याच माऊलीची काय परिस्थिती असेल हे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न… (Child Murder Case)

आता दारात खेळत होतीस…कुठे गेलीस?. क्षणात नजरेआड झालीस तेव्हा वाटलं असशील इथेच खेळत. कुठे कुठे तुला शोधलं नाही…रात्रभर पाय झिजवले का तर कुठेतरी तू आम्हाला दिसशील आणि बघून घट्ट मिठी मारशील. पण प्रयत्न करुनही भेटली नाहीसच. हाकेच्या अंतरावर खेळत होती आणि कुठे गेली हे कळलंच नाही. शेवटी न राहवून पोलिसांत गेलो. खूप शोधलं, आक्रोश केला…आई म्हणून मी कमी पडले का?, मी चुकले का?, ही खंत या शोधात पाठच सोडत नव्हती. भीती गडद होत गेली. पोलीस तुला नक्की शोधतील ही एक अपेक्षा मनात ठेऊन आम्ही घरी परतलो.

आणखी वाचा – ‘बॅटमॅन’ फेम वैल किल्मरचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन, गंभीर आजारामुळे गमावावा लागला जीव, कलाविश्वही हादरलं

घरी परतल्यानंतर कळालं की, तू भेटलीस… हो, तू भेटलीस…पण कायमची दूर गेलेली. त्या नराधमानेच तुला पोलिसांच्या भीतीपायी आपल्या घरात टाकलं. आम्ही तुझ्या शोधात असताना त्याने तुझा मृत जीव बॅगेत भरुन ती बॅग कधी आपल्याच घरी टाकली याचा थांगपत्ता लागू दिला नाही. हे वाईट कृत्य करुन तो बाजूला झाला खरा पण अखेर पोलिसांनीच त्याला शोधलं. त्या नराधमाने तुला आमच्यापासून कायमचं दूर केलं. काय बोलू काहीच कळत नाही आहे गं… ज्या नराधमाने तुझा जीव घेतला त्यालाही चिमुरडी मुलं आहेत. याचा पुसटसाही विचार त्याच्या मनात आला नसेल का?

त्या नराधमाच्या मुलांबरोबर खेळताना तुझे होणारे भांडण म्हणे त्याला सहन झालं नाही. लुटुपुटुची ही भांडण तुझ्या जीवावर बेततील याची कल्पनाही नव्हती. मी उगाच तुला बाहेर जाऊ दिलं का गं?… का मीच कारणीभूत आहे गं तुझ्या जाण्याला… त्या नराधमाला यातून काय मिळालं?, त्याचा हेतू साध्य झाला का?, तुला मारुन त्याचं मन भरलं का?, हे आणि असे अनेक प्रश्न सतत मनात येत आहेत. तुझ्याच वयाची त्याची मुलं, नेहमी दारापुढे घुटमळत असायची, तुमच्यातल्या छोट्या छोट्या वादात मीही डोकवायचे…पण मारुन टाकण्याइतका वाईट विचार कुणाच्याही मनात येईल असं वाटलं नव्हतं…

आणखी वाचा – कपडे बदलत असताना दिग्दर्शक थेट व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, उलटून उत्तर दिलं तेव्हा…

माणसाची वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नाही. एक बाप म्हणून त्याच्या मुलांवरील प्रेमापोटी त्याने आमच्या सोन्यासारख्या लेकीला एवढी मोठी शिक्षा द्यावी?. आता त्याच्या या वाईट कृत्याची शिक्षा त्याला होईलच पण याने माझी लेक परतणार का?… पुन्हा आई म्हणून मला हाक मारणारी माझी हर्षिका दिसेल का?. शेजारच वैरी ठरला की, माझाच निष्काळजीपणा आडवा आला… असेच असंख्य विचार आणि खंत आयुष्यभर पाठ सोडणार नाहीत इतकंच…

Tags: Child Murder Casemurder casetaloja navi mumbai true murder srtory
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kartiki Gaikwad Brother Wedding
Entertainment

भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचा राडा, पारंपरिक लूक व हटके दागिन्यांमुळे खिळल्या साऱ्यांच्याच नजरा, सुंदर फोटो समोर

मे 22, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Trending

लेकीचा छळ माहिती असून आई-वडील गप्प का राहिले?, वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांनाच दोष कारण…

मे 22, 2025 | 6:35 pm
Athiya Shetty Big Decision
Entertainment

फक्त तीन चित्रपट करुन सुनिल शेट्टीच्या लेकीचा बलिवूडला रामराम, अथियाने मोठा निर्णय घेतला कारण…; अभिनेत्याचा खुलासा

मे 22, 2025 | 6:01 pm
Hemant dhome on vaishnavi hagawane death case
Entertainment

“तिच्या आई-बापाचीही चूक कारण… ”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “हुंडाबळी…”

मे 22, 2025 | 5:18 pm
Next Post
Ghibli Art History

Ghibli ट्रेंड नक्की कसा सुरु झाला?, या कंपनीचा मालक कोण?, एकूण कमाई आहे तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.