देशभरात अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे महिलांची सुरक्षितता. गेल्या काही महिन्यांपासून तर महिलांवर अत्याचार व लैंगिंक शोषणाच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सरकारने यासंदर्भात कठोर पावलं उचलणंही तितकंच गरजेचं आहे. बऱ्याचदा एखादी घटना घडली की, काही दिवस त्याबाबत चर्चा केली जाते. मात्र वातावरण शांत झालं की, सगळं जैसे थे. बस, ट्रेन किंवा एखाद्या खासगी वाहनानेही प्रवास करताना बऱ्याचदा स्त्रियांना वाईट अनुभव येतात. वाईट वृत्ती असलेल्या पुरुषांना आपल्याही घरात स्त्री आहे याचा विसर पडत असावा बहुदा… सार्वजनिक वाहनांमध्ये तर कित्येकदा स्त्रियांना घाणेरड्या स्पर्शाचा सामना करावा लागतो. अशीच काहीशी घटना आता घडली आहे. (bus conductor sexually harasses women)
दिवसा बसने प्रवास करत असलेल्या मुलीबरोबर एक विचित्र प्रकार घडला आहे. बंगळुरमधील ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दिवसा बस प्रवाशांनी पूर्ण भरलेली असताना कंडक्टरला घाणेरडी बुद्धी सुचली. त्याने बसच्या एका सीटवर मुलीला झोपलेलं पाहिलं. तो त्याच जागी खांबाला टेकून उभा राहिला. आजूबाजूला प्रवाशी उभे होते. ती मुलगी झोपेमध्ये अगदी मग्न होती. तिच्या बाजूला खिडकीच्या दिशेला बसलेली मुलगीही झोपेतच होती.
कंडक्टरने अगदी तिच वेळ साधली. झोपेत असलेल्या मुलीला त्याने पहिल्यांदा स्पर्श केला. तो इथवरच थांबला नाही. आपल्याला कोण बघत आहे की नाही याचा त्याने अंदाज घेतला. पुन्हा तो तिच्या स्तनाला स्पर्श करु पाहत होता. त्याने तिच्या कमरेवरही हात ठेवला. नकळतपणे त्याच्याकडून ही घटना घडली नसल्याचंही कॅमेऱ्यामधून स्पष्ट दिसत आहे. हा विचित्र प्रकार एका प्रवाशानेच कॅमेऱ्यामध्ये कैद केला.
पाहा व्हिडीओ
కేఎస్ఆర్టీసీ బస్సులో నిద్రపోతున్న యువతిని లైంగికంగా వేధించిన కండక్టర్
— Telugu Scribe (@TeluguScribe) April 25, 2025
కర్ణాటకలోని మంగళూరు సమీపంలోని ముడిపు-స్టేట్ బ్యాంక్ మార్గంలో నడిచే కేఎస్ఆర్టీసీ బస్సులో ఓ యువతి నిద్రపోతుండగా ఆమె పక్కనే వచ్చి నిలబడి ఆమెను పదేపదే టచ్ చేస్తూ లైంగికంగా వేధించిన కండక్టర్
ఇది గమనించిన తోటి… pic.twitter.com/NyYRyb3vwV
आणखी वाचा – मुलांना कायमचं सोडून पाकिस्तानात गेलेली ‘ती’, मुलांच्या उपचारांपुढे हरलेला बाप अन् कायमचा भारताला रामराम
कंडक्टरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. १ मिनिट १२ सेकंदमधील या व्हिडीओमध्ये तो सतत स्पर्शच करण्याच्या हव्यासापोटी धडपड करत होता. मात्र झोपेत असलेल्या मुलीला याची पुसटशी कल्पना नव्हती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने या कंडक्टर विरोधात कठोर कारवाई केली आहे. त्याला नोकरीवरुनही निलंबित करण्यात आलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत सरकारने घेतलेल्या ठाम निर्णयाचं स्वागतंही केलं.