शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

करण जोहरच्या बाथरुममध्ये चक्क पितळेचे डब्बे, भांडी, संपूर्ण इंटेरियर करण्यासाठीच तांब्याचा वापर, Inside Video समोर

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 14, 2025 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
karan johar bathroom

करण जोहरच्या बाथरुमची सर्वत्र चर्चा

बॉलिवूडमधील निर्माती, दिग्दर्शिका व नृत्यदिग्दर्शिका फराह खान सध्या खूप चर्चेत आहे. आजवर फराहने अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच सोशल मीडियावरदेखील फारह मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली बघायला मिळते. सध्या ती तिच्या व्लॉगिंगमुळे खूप चर्चेत आली आहे. युट्यूबवर तिचे खूप व्लॉग बघायला मिळतात. फराह अनेक कलाकारांच्या घरी जाते आणि त्यांच्या किचनमध्ये जाऊन जेवण बनवण्याचे व्हिडीओ ती पोस्ट करत असते. हे सगळेच व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. अशातच ती आता तिचा खास मित्र व चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरी पोहोचली. यावेळी त्यांनी चॉकलेट फजची रेसिपी ट्राय करताना दिसत आहेत. तसेच यामध्ये असं काही दिसलं ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. (karan johar bathroom)

व्हिडीओच्या सुरुवातीला फराह करणच्या घरी पोहोचलेली दिसून येत आहे. त्याच्या घरामध्येच त्याचं ऑफिसदेखील आहे. यावेळी तिने करणच्या घराची झलकदेखील दाखवली. घरातील हॉल, किचन, बेडरुम, लिव्ह इन रुम असं सगळं काही दिसून येतं. मात्र व्हिडीओतील एका ठिकाणी सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. करणच्या घरातील पाहुण्यांसाठी असलेल्या बाथरुमकडे सगळ्यांच्याच नजरा खिळल्या. हे बाथरुम उच्च दर्जाच्या पितळेने बनलेले असल्याचे करणने सांगितले.

आणखी वाचा – गाडी चालवणाऱ्या महिलांची अक्कल काढणाऱ्यांवर भडकली मराठी अभिनेत्री, आला वाईट अनुभव, म्हणाली, “रस्ता खोदलेला असताना…”

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

हे बाथरुम खूपच अलिशान असून यामध्ये संपूर्ण काम हे पितळेचे असलेले दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये फराह म्हणते की, “मी स्वतःला किती गरीब समजू?”. दरम्यान यावेळी फराह व करणच्या सगळ्या जुन्या आठवणी ते सांगताना दिसतात. या बाथरुममध्ये पितळेचे डब्बे ठेवलेले दिसत आहेत. मात्र हे डब्बे केवळ सजावटीसाठी असल्याचे करण फराहला सांगतो.

आणखी वाचा – प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनमधला फरकही अंकिता लोखंडेला कळेना, कॅमेऱ्यासमोरच घडली ‘ती’ तूक, प्रेक्षक म्हणाले, “अशिक्षित…”

याचवेळी करण फराहचीदेखील बॅग उघडतो आणि तिच्या बॅगमध्ये काय आहे? हे दर्शकांना सांगताना दिसतो. करणला फराहच्या बॅगमध्ये ५०० रुपयांची नोट मिळते. त्यावर करण म्हणतो की हे पैसे शगुनचे आहेत. त्यावर फराह करणला मस्करीमध्ये “सदा सौभाग्यवती भव”, असा आशीर्वाद देते. नंतर लगेचच करण म्हणतो की, “फराह माझ्या हातांना हळद कधी लागणार?”, त्यावर फराह म्हणते की, “आधी चॉकलेट फज तयार करुया मग तुझ्या हळदीचं बघूया”. दरम्यान फराहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.    

Tags: bathroomfarah khankaran joahar
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

secrets of a long and happy marriage
Lifestyle

घटस्फोट, ब्रेकअपच्या जगात नातं टिकवण्यासाठी तुम्ही काय करता?, आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी हे सात मार्ग फॉलो केले तर..

मे 24, 2025 | 3:38 pm
Mayuri Jagtap Letter to State Women Commission
Social

सासऱ्यांनी छातीला हात लावला, दीराने प्रायव्हेट जागेवर मारत…; हगवणेंच्या मोठ्या सूनेच्या आईचे पत्राद्वारे गंभीर आरोप, क्रुर कृत्य

मे 24, 2025 | 2:46 pm
mohit raina unfollowed his wife
Entertainment

‘देवो के देव…’मधील शिव खऱ्या आयुष्यात अडचणीत, बायकोबरोबरच्या वादानंतर तीन वर्षांचा संसार मोडणार?, अनफॉलो केलं अन्…

मे 24, 2025 | 1:45 pm
Brother Rahul dev on mukul dev death
Entertainment

भावाच्या निधनामुळे पुरता कोलमडून गेला राहुल देव, आई-वडिलांचं जाणं मुकूलला सहन झालं नाही अन्…; लेक एकटीच राहिली

मे 24, 2025 | 1:26 pm
Next Post
Marathi Actor Saorabh Choughule shared his Mahakumbh Mela experience on social media with sharing video

"जोपर्यंत तो बोलवत नाही तोपर्यंत...", महाकुंभ मेळ्याला गेलेल्या मराठी अभिनेत्याला दैवी अनुभव, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.