Sheeba Chaddha recalls working with Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या अफेअरबाबत अनेकांना माहित आहे. एकेकाळी ही जोडी अभिनयासह त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. मात्र, कालांतराने त्यांच्यात वाद झाला आणि ते वेगळे झाले. त्यांच्या या नात्याचा परिणाम अभिनयावरही होताना दिसला. सुप्रसिद्ध अभिनेत्री शिबा चड्ढाने याबाबत भाष्य केलं. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर घडलेला हा किस्सा होता. या चित्रपटात सलमान व ऐश्वर्या भूमिकेत होते. यावेळी एका सीनदरम्यान सलमानने ऐश्वर्या रायसमोर शिबाला मिठी मारण्यास नकार दिला.
सिद्धार्थ कन्ननशी बोलताना शिबाने हा किस्सा ऐकवला. ती म्हणाली, “ऐश्वर्या, सलमान आणि मी असा आमच्या तिघांचा एक सीन होता. या सीनमध्ये सलमानला मला मिठी मारायची होती. पण त्याने नकार दिला. मला अजूनही आठवतंय. हा क्लायमॅक्समधील सीन होता. मी पळून जाणार, असा सीन होता. त्यावेळी ऐश्वर्या राय व सलमान मला मिठी मारणार होते. पण सलमान म्हणाला, ‘मी मिठी मारणार नाही’. त्यानंतर शूटिंग काही वेळेसाठी थांबवण्यात आलं आणि संजय लीला भन्साळीला सलमानशी बोलावं लागलं”.
आणखी वाचा – “आठवणींनी झोळी भरली पण…”, ‘शिवा’ला निरोप देताना पूर्वा कौशिकच्या डोळ्यांत पाणी, म्हणाली, “माझ्या मर्यादा…”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “सलमान असं का वागला, हे समजलेच नाही, असं शीबा सांगते. “मी त्याला का विचारू की तो नकार का देतोय? मी नवीन होते; मला वाटलं की मी बोलू नये आणि दिग्दर्शकानेच ती परिस्थिती हाताळावी. मला खात्री आहे की नकार देण्याची त्याची काही कारणं असतील, पण ती कारणं काय होती यात मला रस नाही. मी माझ्या सह-अभिनेत्याला मला मिठी मारण्यास सांगत नव्हते, तर दिग्दर्शक दोन पात्रांना एकमेकांना मिठी मारण्यास सांगत होता. जर त्याला काही अडचण होती तर ती बोलून सोडवायला हवी होती. त्यावेळी मला असं वाटत होतं की किमान शूटिंग तरी पूर्ण करा”, असं शीबा म्हणाली.
शूटिंग दरम्यान सलमान अचानक सेटवरुन निघून गेला होता, तेव्हा काय घडलं होतं याबद्दल शीबा म्हणाली, “नक्कीच काहीतरी घडलं होतं, ज्यामुळे सलमान चिडला. मला आठवतंय सलमान अचानक रागात सेटवरुन निघून गेला. तो अचानक रागात बाहेर पडला. त्याने दार बंद केलं आणि एका म्हाताऱ्या लाईटमनला कदाचित सलमानमुळे लागलं होतं. पण हो सलमान रागात निघून गेला होता आणि ते पाहून ‘बाप रे, स्टार्स असेच वागतात का?’ असा विचार मी करत होते”.





